तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक प्रगती कडे विषेश लक्ष देणारी शाळा ‘G D' इंग्लीश स्कूल

पाथरी शहरातील बालकांना स्पर्धेच्या युगात दर्जेदार इंग्रजी शिक्षण देण्या साठी दोन वर्षा पुर्वी जायकवाडी परिसरात एक एक्कर क्षेत्रात संचालक राम घटे सर, शेख सलीम सर या व्दयांनी "G D“ इंग्लीश स्कूल सुरू केली या साठी अतिषय निसर्ग रम्य असा शाळेचा परिसर बनवला असून शाळेच्या सर्व क्लास रुम डिजिटल केलेल्या आहेत. या शाळेत नर्सरीते ६ वी पर्यंत वर्ग सुरू असून अतिषय गुणवत्ता पुर्ण शिक्षणा बरोबरच बालमनात लपलेल्या सुप्त कला गुणां साठी संगीत,नृत्य, भारतीय खेळ,चित्रकला, स्वरक्षणा साठी कराटे प्रशिक्षण ही दिले जाते. प्रशिक्षित पदविधर शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या असल्याने आणि प्रत्यक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन प्रगती कडे संचालक आणि गुरूजनांचे लक्ष असल्याने प्रवेशा नंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता महिणा भरातच दिसून येत असल्याची प्रतिक्रीया पालकां मधून व्यक्त होते. पहिल्या वर्षी १८८ दुस-या वर्षी २२४ असा वाढता आलेख दिसून आला.शिक्षणा सोबतच विविध उपक्रम घेऊन बालकांना आकर्षक बक्षिसे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान केली जातात. आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन्स ची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली जातात त्या मुळे स्पर्धा परिक्षे सारखी तयारी करण्याची माणसिकता विद्यार्थ्यांची तयार करून घेतली जाते. ऑलंपियाड सारख्या देशपातळी वरील स्पर्धा परिक्षा घेतली जाते वर्षी या शाळेचे ११३ विद्यार्थी या परिक्षेत यशस्वी झाले तर ४७ विद्यार्थ्यी या परिक्षेत सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. या बरोबरच विद्यार्थ्यां साठी अतिषय नियोजन बद्ध असे वार्षिक स्नेहसंमेलन घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांनां वाव दिला जातो या सोबतच स्टेज करेज याव म्हणून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पिच देण्याची संधी मिळून दिली जाते. अशा या शहरातील नामवंत शाळेत या वर्षी प्रवेशा साठी नर्सरीते ६ वी वर्गा साठी पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशा साठी धडपडत आहेत. या शाळेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदुशन मुक्त वातावरण, शहराच्या निवांत, शांत असलेल्या भागात असल्याने बालकांना सुरक्षितता आणि निरामय स्वास्थ्य, आरोग्य अनुभवायला मिळते. शाळेत पुर्ण वेळ आर आे चे पाणी उपलब्ध असते. अशा या पाथरी शहरातील सर्वगुण संपन्न "G D” इंग्रजी शाळेत प्रवेश संख्या मर्यादित असल्याने पालकांनी गुणवत्ता पुर्ण शिक्षणा साठी आपल्या पाल्याला लवकरात लवकर प्रवेशीत करण्याचे आवाहन संचालक राम घटे, शेख सलीम यांनी केले आहे.
Adv

Tuesday, 5 June 2018

पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपन


प्रा.डॉ. संतोष रणखांब
तेजन्युज हेडलाईन्स प्रतिनिधी
सोनपेठ : येथिल वृक्षरोपण व संवर्धन चळवळ सोनपेठ व नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संघटना परभणी, बसस्थानक सोनपेठ, तहसिल कार्यालय सोनपेठ, कै. राजाभाऊ कदम इंग्लिश स्कुल सोनपेठ या व इतर संस्था संघटनांनी एकत्र येत बसस्थानक परिसर व तहसिल कार्यालय परिसरात वृक्षारोपन केले. यावेळी तहसिलदार जिवराज डापकर, स्थानक व्यवस्थापक जमशेट्टे, माजी प्राचार्य माणिकअप्पा  निलंगे, प्रा. धनंजय जवळेकर, महेश जाधव, माऊली आदत, दत्तात्रय मोरे आदिंची उपस्थिती होती.
जागतीक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने वृक्षारोपन व संवर्धन चळवळ सोनपेठ व नैसर्गीक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संघटना परभणी यांच्या पुढाकारातून बसस्थानक परिसरात व तहसिल कार्यालय परिसरात वृक्षारोपन करण्यात आले. आत्तापर्यंत या संघटनांनी अनेक ठिकाणी वृक्षलागवड करून त्याचे संगोपनही केले आहे.
यावेळी शिवाजी शिंदे, पत्रकार गणेश पाटील, गजानन चिकणे, राधेशाम वर्मा, कृष्णा पिंगळे, सुधीर बिंदू, मंजुर मुल्ला, सय्यद खदीर, सुनिल केंद्रे, प्रा.डॉ. संतोष रणखांब,  शाम बोकरे, भास्कर ताल्डे, सुशिल सोनवणे, पंडीत राठोड, विजय राजभोज, सचिन सिरसाठ, संभाजी खंदारे, ज्ञानेश्वर वाघमारे, श्रीकांत गौरशेटे, शशीकांत स्वामी, डॉ. दिपक वडकर, नितीन हरकाळ, सोमेश्वर आरबाड, कारभारी चांभारे, परमेश्वर नवघरे, एकनाथ गंगणे, श्रीराम जाधव, चव्हाण कै. राजाभाऊ कदम इंग्रजी शाळेचे प्राचार्य दत्ता नरहारे, अण्णा नायकोडे, विनोद पारेकर, सुजीत माळी, रंगनाथ गांगर्डे, प्रकाश पवार, बाळासाहेब परळकर, गव्हाणे मँडम, सोनवणे मँडम यांच्यासह अनेक विद्यार्थी व नागरीक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment