तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 11 June 2018

विजेच्या समस्या दुर न केल्यास महावितरणला घेराव घालणार -

शिवसेना शहर प्रमुख मनिष कदम यांचा इशारा

सेलू: प्रतिनिधी
तालुक्यात विजेच्या समस्यांनी कळस गाठला   असून शहरात देखील अशीच अवस्था आहे. तातडीने या समस्या न सोडविल्यास  महावितरणच्या अधिकार्‍यांना घेराव घालून जाब विचारणार असल्याचा खणखणीत इशारा शिवसेनेचे शहरप्रमुख तथा नगरसेवक मनीष कदम यांनी दिला आहे
शहरातील अनेक जुनाट  रोहित्र बसवल्याने वारंवार लाईट जाणे रोहित्र  मध्ये बिघाड होणे. यासारख्या  समस्यां उद्भवत  आहेत. या बरोबरच अन्य  समस्यात हि  दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच जुनाट तारेमुळे देखील नागरिकांना त्रास होत आहे. झालेल्या पोलवरील बहुतेक ठिकाणी संरक्षक तार नसल्याने देखील धोका निर्माण झालाआहे. एकंदरीत महावितरण कंपनी  कडून  ग्राहकांना सेवा पुरवण्यात अपयशी ठरत आहे. असे  असताना विज बिल मात्र वाढतचं आहे.   अनेक ग्राहक या वाढीव वीज बिलामुळे त्रस्त झाले आहेत. हीच परिस्थिती ग्रामीण भागात आहे. वारंवार सूचना देऊनही महावितरणचे अधिकारी ग्रामीण भागातील विजेचा प्रश्न बाबत दुर्लक्ष करीत आहेत. ग्रामीण भागात थोड्याही   वा-याने  वीजेचा प्रश्न निर्माण होतो. एकदा लाईट गेली की अनेक तास लाईट सुरू होत नसल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतीला पाणी देणे व अंधाराचाही सामना करावा लागतो. अवघड झाले आहे. त्यामुळे तातडीने विजेच्या समस्या न सोडविल्यास शिवसेनेच्या माध्यमातून महावितरणच्या अधिकार्‍यांना घेराव घालून जाब विचारणार असल्याचे शिवसेनेचे तालुका प्रमुख तथा नगरसेवक  मनीष कदम यांनी जाहीरकेलेआहे.

No comments:

Post a Comment