तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 11 June 2018

माखणी ते फुलकळस रस्त्याची पहिल्याच पावसात दुरावस्था


ताडकळस/ प्रतिनिधि गोविंद मठपती
                 पुर्णा तालुक्यातील माखणी ते फुलकळस रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली असून 8 जुन रोजी परिसरात झालेल्या पहिल्याच जोरदार पावसात रस्त्यावर सर्वत्र चिखल व खड्डेच खड्डे झाले आहेत. या भागतील नागरीकांनी मागील वर्षी वारंवार रस्ता दुरुस्तीची मागणी केली होती तसेच या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी या मागणीसाठी 06 सप्टेंबर 2017 रोजी माखणी ग्रामस्थांनी सिंगणापुर ते ताडकळस रोड वरील पाटी वरच आमरण उपोषण सुरु केले होते. त्यांना पाठीबा देण्यासाठी विद्यार्थ्यासह गावकऱ्यांनी माखणी पाटीवर ठिया मांडला होता या आंदोलनाची दखल घेत ताडकळस ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने पुढाकार घेउन सार्वजनिक बाधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यासी संपर्क करुन सार्वजनिक बाधकाम उप विभाग पुर्णाचे उप अभियंता के. एच. सोनावणे यांनी उपोषण स्थळी भेट देऊन आंदोलकांना दि. १२/०९/२०१७ रोजी पर्यंत रस्त्याची किरकोळ दुरुस्ती करुन मजबुती करणाचा प्रस्ताव वरिष्ठस्तरावर पाठवण्याचे लेखी आश्वासन दिले. ताडकळस पत्रकार संघाच्या यशस्वी मध्यस्थी नतंर सदर आंदोलन स्थगीत करण्यात आले होते. त्यानतंर सा.बा. विभागाच्या वतीने रस्त्यावरील खड्ड्यात थातुर मातुर मुरुम टाकुन बोळवन करण्यात आली होती. पंरतु  8 जुन रोजी परिसरात झालेल्या पहिल्याच  पावसात रस्त्यावर सर्वत्र चिखल व खड्डेच खड्डे झाल्यामुळे दुचाकीचे अपघात होण्याच्या घटना घडत आहेत. सध्या परिसरातील शेतकरी पेरणीच्या तयारीत आहेत. त्यासाठी लागणारी बी- बीयाणे, औषधी व खते इत्यादी साहित्य ताडकळस येथील बाजपेठेतून खरेदी केले जाते तसेच विविध बँकांच्या शाखा, शाळा महाविद्यालय व सर्व व्यवहार ताडकळस येथे असतात परंतु माखणी ते फुलकळस रस्ता खराब झाल्यामुळे जास्तीचे वाहणभाडे देऊनही वाहण चालक या खराब झालेल्या रस्त्यामुळे माल वाहतुक करण्यास तयार होत नाहीत.  तसेच माखणी वरपुड, पांढरी व पोरजवळा इत्यादी गावांना ताडकळस बाजार पेठेसी जोडनार हा परिसरातील महत्वाचा रस्ता आहे.
परिसरातील शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी सायकल वर तर विद्यार्थींनीसाठी मानव विकास कार्यक्रमा अंतर्गत बसने ये जा करतात. अत्यंत खराब झालेलेल्या रस्त्यामुळे 15 जुन पासुन सुरु होणारी हि बस सेवा सुरु होते की नाही अशी शंका पालकातून व्यक्त होत आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होण्याची शकता निर्माण झाली आहे. दुचाकी स्वारांना हा रस्ता पार करणे म्हणजे मोठे दिव्यच होऊन बसले आहे. संबंधीत प्रशासकिय अधिकारी या कडे जाणीव पुर्वक दुर्लक्ष  करीत आहेत तर  लोक प्रतिनिधी व राजकिय पक्षाचे पुढारी लक्ष देत नसल्याची भावना माखणी ग्रामस्थामध्ये पसरली आहे. रस्त्यावर पडलेल्या खड्यामुळे वाहनचालक व प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत परंतु प्रशासन गेली दोन वर्षा पासुन ग्रामस्थांच्या मागणी कडे अक्षम्य दुर्लक्ष्य करीत आसल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत. जर प्रशासनाने लवकरच या रस्त्याच्या दुरावस्थेकडे लक्ष देऊन दुरुस्ती केली नाही तर गावकऱ्यांच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा छावा मराठा संघटनेचे जिल्हाध्यक्ष माधव आवरगंड, शिवसेनेचे गोविंदराव आवरगंड, सुनिल आवरगंड, हारी मिसाळ यांनी सदर प्रतिनिधीसी बोलतांना दिला


No comments:

Post a Comment