तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 13 June 2018

पूर्णेत पोलिस अधीकाऱ्यांच्या बदल्या.


परभणी पोलिस दलात बदल्यांचे सत्र सुरू झाले असून पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्यानंतर आता पोलिस अधीकाऱ्यांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत. पूर्णा शहर, तालुक्यातील ताडकळस व चुडावा येथिल एकूण ५ पोलीस अधीकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहे. एका अधिकाऱ्यास एकवर्ष वेटींगवर ठेवण्यात आले असल्याचे पोलीस सुत्रांकडून समजते.पूर्णा शहरात गत ३ वर्षापूर्वी रुजू झालेले उपविभागीय पोलिस अधिकारी ए.जी. खान यांची नांदेड येथे पोलीस मुख्यालय पोलीस उपअधीक्षकपदी बदली करण्यात आली. त्यांच्या जागेवर ठाणे शहर मुंबई येथील उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकृष्ण कर्डीले यांची वर्णी लावण्यात आली आहे. चुडावा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक मिना कर्डक यांची मानवत येथे तर ताडकळस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश लांडगे यांची पोलीस अधीक्षक कार्यालय परभणी येथे बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर गुलाब पाटेकर यांची नियुक्ती करण्यात आली असून पूर्णा पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक विशाल बहात्तरे यांची चुडावा येथेव फौजदार अनिल लांडगे यांची ताडकळस येथे बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर परभणी येथील फौजदार मेहबूब खान गुलाब खान पठाण व अच्यूत विश्वनाथ मुपडे यांना नियुक्ती मिळाली आहे. पूर्णा पोलिस ठाण्यातील फौजदार गणेश राठोड यांना अजून एक वर्ष बदलीसाठी प्रतिक्षा करावी लागणार असल्याचे पोलीस सुत्रांकडून समजते.

No comments:

Post a Comment