तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 12 June 2018

टॉपर्सचे बोर्ड झळकावणाऱ्या क्लासेसवर बंदी येणार ?


क्लासमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमधील ज्या विद्यार्थ्यांना उत्तम मार्क मिळाले आहेत त्यांचे सगळ्यांचे फोटो एकत्र करून मोठाल्या जाहिराती करणाऱ्या खाजगी क्लासेसवर अंकुश आणण्याबाबत राज्य सरकार विचार करतंय.  खाजगी क्लासेसवर कोणाचेही निर्बंध नाहीयेत यामुळे अनेकदा अवाजवी फी घेणे, सुमार दर्जाचे शिक्षण दिले जाणे, प्रशिक्षित शिक्षक नसणे, क्लासमधून पेपरफुटी होणे असे प्रकार वाढीला लागले आहेत. या गोष्टींवर निर्बंध आणण्यासाठी राज्य सरकारने एक कायदा करण्याचं ठरवलं आहे.या प्रस्तावित कायद्यासंदर्भात सूचना आणि हरकती मागवण्यात आल्या होत्या. या सूचना हरकतीनंतर तयार करण्यात आलेल्या नव्या मसुद्यामध्ये जाहिरातबाजी करणाऱ्या क्लासवर बंदी घालावी असं स्पष्टपणे लिहलं आहे.
या मसुद्याअनुसार घरगुती शिकवण्यांमध्ये फक्त ५ विद्यार्थ्यांना प्रवेश देता येऊ शकेल. पूर्वी अशी कोणतीही विद्यार्थी मर्यादा घरगुती शिकवण्यांसाठी नव्हती. नव्या मसुद्यामध्ये रोखीच्या स्वरुपात फी स्वीकारण्यावर बंदी घालण्याबाबत उल्लेख करण्यात आलेला नाहीये. पूर्वी रोखीने फी स्वीकारण्यावर क्लासेसवर बंदी होती. क्लासमध्ये शिकवणाऱ्यांना खाजगी शिक्षक किंवा मार्गदर्शक म्हटलं जाईल. ज्या क्लासबाबत आर्थिक गडबडीची तक्रार मिळेल त्या क्लासवर अधिकारी धाडी टाकू शकतात. तसेचक्लासेसना स्वत:च्या नोटस तयार करून त्या विद्यार्थ्यांना द्याव्या लागतील. कोचिंग क्लासने सरकारकडून मिळणारा परवाना दर तीन वर्षांनी नुतनीकरण करावे लागेल तर घरगुती क्लासेसना हे नुतनीकरण दर ५ वर्षांनी करावे लागेल. हे सगळे नियम हे अत्यंत जाचक असल्याचं क्लास चालकांचं म्हणणं असून  गरज पडल्यास या कायद्याविरोधात न्यायालयात जाण्याची तयारीही क्लास चालकांनी सुरू केली आहे.

No comments:

Post a Comment