तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 12 June 2018

पुण्यात चालत्या एसटीत कोयत्यानं सपासप वार करुन तरुणाची हत्या.


चालत्या एसटीमध्ये एका तरुणाची कोयत्यानं सपासप वार करुन निर्घृण हत्या करण्यात आल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. खेड तालुक्यात चालत्या एसटीमध्ये प्रवाशांनी हा थरार अनुभवला. श्रीनाथ सुदाम खेसे असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून आरोपीचं नाव अजित कान्हूरकर आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, घटनेनंतर एसटी चालकाने बस थेट खेड पोलीस ठाण्यात नेली. आरोपी अजित कान्हूरकरनं श्रीनाथच्या बहिणीचे अश्लील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. आरोपी विरोधात श्रीनाथने 8 जूनला पोलिसांत तक्रार देखील दिली होती. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. मात्र पोलिसांनी योग्य ती कारवाई केली नाही. पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे हे हत्याकांड घडल्याचा आरोप करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment