तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 14 June 2018

कोलकाताला जाणाऱ्या जहाजाला भीषण आग, २२ पैकी ११ क्रू मेम्बर्सना वाचवण्यात यश.


कोलकाताला जाणाऱ्या MVSSL या जहाजाला भीषण आग लागली असल्याची माहिती मिळत आहे. हे जहाज कृष्ण पटनम येथून कोलकाताला जात असताना ही आग लागली. कंटेनरमध्ये स्फोट झाल्यानंतर ही आग लागलीआहे. जहाजावर एकूण २२ क्रू मेम्बर होते. यापैकी ११ जणांना वाचवण्यात यश आलं असून इतरांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे ही आग लागली आहे. जहाजावर आग लागल्याची माहिती मिळताच बचावकार्यासाटी हलदिया येथून मदत पाठवण्यात आली आहे. हवामान खराब असल्या कारणाने आणि वेगाने वारे वाहत असल्या कारणाने आग वेगाने वाढत आहे. २२ पैकी ११ क्रू मेम्बर्सना वाचवण्यात यश आलं असून अद्यापही बचावकार्य अद्यापही सुरु आहे.

No comments:

Post a Comment