तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 12 June 2018

भय्यूजी महाराजांची चार ओळींची सुसाईड नोट.


आध्यात्मिक गुरु भय्यूजी महाराज उर्फ उदयसिंह देशमुख यांनी स्वत:वर गोळी झाडून घषऊन आत्महत्या केली. आयुष्यातील ताण तणावामुळे आत्महत्या करत असल्याचे त्यांच्या खोलीत सापडलेल्या सुसाईड नोट मध्ये लिहले होते.‘माझ्या आत्महत्यासाठी कोणालाही जबाबदार धुरु नये. आयुष्यात आलेल्या ताणतणामुळे मी आत्महत्या करत आहे.’असे सुसाईड नोटमध्ये लिहले होते आढळले. त्यांनी आत्महत्या करण्यासाठी स्वत:वर गोळी झाडून घेतली त्यावेळी घरामध्ये पत्नी आणि आई होती. आत्महत्योचा प्रयत्न केल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण उपचारापूर्वींच त्यांची प्राणज्योत मालवली.भय्यूजी महाराज यांचा जन्म मध्य प्रदेशमधील शाजापूर येथे २९ एप्रिल १९६८ मध्ये झाला. उदयसिंह विश्वासराव देशमुख असे त्यांचे नाव. वडील विश्वासराव देशमुख हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते. सुरुवातीच्या काळात मॉडेलिंग करणार्या उदयसिंह देशमुख यांचा आध्यात्माकडे ओढा होता. मध्य प्रदेश सरकारने भय्यूजी महाराज यांना मंत्रिपदाचा दर्जा देऊ केला होता. परंतु, त्यांनी आध्यात्मिक क्षेत्रात काम करणार्यांना अशा पदांची गरज नसते असे सांगत सन्मानपूर्वक नकार दिला होता.

No comments:

Post a Comment