तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 9 June 2018

शेतकरी महिलेची गळफास घेऊन आत्महत्या


प्रा. डॉ. संतोष रणखांब
तेजन्युज हेडलाईन्स प्रतिनिधी
सोनपेठ : तालुक्यातील मौजे धामोनी येथे एका वृध्द शेतकरी महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटणा दिनांक 9 जुन रोजी सकाळी घडली
तालुक्यातील धामोनी येथील चंद्रकला रतन मुळे वय 60 या शेतात धसकटे विचन्यासाठी घरातुन सकाळी आठ वाजता गेल्या होत्या त्यानंतर त्यांचा मुलगा शेतात गेला आसता शेतात आसलेल्या विजेच्या टावरला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसले त्यानतंर त्याने गावातील नातेवाईकांना फोनद्वारे माहिती दिली.
चंद्रकला मुळे यांचे धामोनी शिवारात गट नं 184 मध्ये चार एकर शेती आसुन त्याच्यावर स्टेट बँक ऑफ हैद्राबाद सोनपेठ शाखेचे दिड लाख रूपयांचे कर्ज होते सततची नापीकी व बँकेचे कर्ज यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याची तक्रार त्यांचा मुलगा राम रतन मुळे यांनी दिली
चंद्रकला मुळे यांचे पती पंचवीस वर्षापूर्वी वारलेले होते त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुल व दोन विवाहित मुली आहेत
याबाबत सोनपेठ पोलीसात आकस्मित मृत्यूची नोंद झाली आसुन पुढील तपास पोलीस निरीक्षक सोपान शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार संतोष मुपडे हे करत आहेत.

No comments:

Post a Comment