तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 13 June 2018

‘नाणार’ची अधिसूचना रद्द करण्याचे काम अंतिमटप्प्यात – सुभाष देसाई.


कोकणात होऊ घातलेल्या नाणार प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध आहे. तेथाल अनेक गावांतील ग्रामपंचायतींना नाणार प्रकल्प नको असल्याने त्यांनी तसा प्रस्ताव दिला आहे. त्यानुसार या प्रकल्पाची अधिसूचना रद्द करण्याचे काम सुरू केले असून ते अंतिम टप्प्यात आले आहे, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली. उद्योग विभागातर्फे आयोजित रोजगार मेळाव्याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत सुभाष देसाई बोलत होते. राज्यात अनेक ठिकाणी विविध प्रकल्प घोषित करण्यात आले आहेत. त्यासाठी शेतकऱयांच्या जमिनी अधिग्रहण कराव्या लागणार आहेत. मात्र,अनेक ठिकाणी काही खासगी लोक प्रकल्पग्रस्त शेतकऱयांच्या जमिनी खरेदी करत आहेत. या सर्वप्रकारात शेतकऱयांचे नुकसान होत असल्याचे निदर्शनात आले आहे. शासन प्रकल्पग्रस्तांनाजमिनीच्या चारपट मोबदला देत आहे. मात्र मूळ मालक जमीन विकत असल्याने हा मोबदला त्यांना न मिळता नवीन खरेदीदाराला मिळत आहे. त्यामुळे शेतकऱयांनी आपल्या जमिनी शासनालाच द्याव्यात, असे आवाहनही उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले.

आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत शनिवारी रोजगार मेळावा....

महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागातर्फे राज्यभरात रोजगार व स्वयंरोजगार मेळावे घेतले जात आहेत. या मेळाव्यांमध्ये तरुणांना नोकरी मिळते की नाही, नोकरीसाठी कोणत्या अडचणी येतात याचा पाठपुरावा करण्यासाठी उद्योग विभागातर्फे स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात येणार आहे अशी माहिती राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, येत्या शनिवारी पुणे जिह्यातील उरळी देवाची येथे ‘बाळासाहेब ठाकरे रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्या’चे आयोजन करण्यात आले असून शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा मेळावा संपन्न होणार आहे, असेही देसाई यांनीसांगितले.

No comments:

Post a Comment