तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 11 June 2018

राज्यातील इंटर्न डॉक्टर उद्यापासून बेमुदत संपावर.


पुण्यातील बी.जेसह राज्यातील १८ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील दोन हजार  इंटर्न डॉक्टर्स उद्यापासून बेमुदत संपावर जाणार आहेत. मासिक विद्यावेतन (स्टायपेंड) 6 हजारावरून 11 हजार वाढून मिळण्याच्या मागणीसाठी डॉक्टरांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. डॉक्टरांच्या या निर्णयामुळे रुग्णालयातील वैद्यकीय सेवांवर त्याचा परिणाम होणार आहे.  एम. बी. बी. एस. हा साडेचार वर्षाचा वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर अभ्यासक्रमाचा भाग आणि प्रत्यक्ष रुग्णसेवेत येण्यासाठी विद्यार्थ्यांना त्याच महाविद्यालयात एक वर्षाचे प्रशिक्षण घ्यावे लागते. यामध्ये त्यांना वरीष्ठ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली तातडीचा विभाग (कॅजुल्टी) सह इतर विभागात काम करावे लागते. प्रत्यक्षात 12 तास काम करण्याचानियम असताना मात्र, 17 ते 18 तास काम करावे लागले. या कामासाठी त्यांना वैद्यकीय शिक्षण विभागाकडून महिन्याकाठी 6 हजार विद्यावेतन देण्यात येते. प्रत्यक्षात त्यामध्ये प्रत्येकवर्षी वाढ करणे अपेक्षित असताना सन 2012 पासून त्यामध्ये वाढ करण्यात आलेली नाही.सहा हजार हा खूप कमी मोबदला असून त्यामध्ये 11 हजार रुपयांची वाढ करावी. याबाबत वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी 2015 मध्ये आश्वासन मध्ये दिले होते. पण, त्याची अंमलबजावणी अद्याप करण्यात आलेली नाही. त्याविरोधात हा बेमुदत संप करण्यात येणार असल्याची माहिती 'असोसिएशन ऑफ स्टेट मेडिकल इंटर्न महाराष्ट्र'चे पुण्यातील बी जे तील प्रमुख डॉ. केतन देशमुख यांनी दिली.

No comments:

Post a Comment