तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 13 June 2018

प्लॅस्टिकची पिशवी हातात दिसल्यास पाच हजाररुपये दंड.


प्लॅस्टिक बंदीची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारने दिलेली २३ जूनची मुदत संपत आली असून त्यानंतर मात्र प्लॅस्टिकची पिशवी वापरणाऱयांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. प्लॅस्टिकची पिशवी देणाऱया आणि घेणाऱया अशा दोघांवरही ही कारवाई केली जाणार आहे. प्लॅस्टिकची पिशवी सापडल्यास पाच ते पंचवीस हजार रुपयांपर्यंत दंड केला जाणार आहे. प्लॅस्टिकच्या पिशव्या, यूज अॅण्ड थ्रो प्रकारची कटलरी, हॉटेलमधील पार्सल देण्यासाठी वापरले जाणारे कंटेनर, स्ट्रॉ, प्लॅस्टिकचे चमचे, ग्लास अशा वस्तू दुकानदारांकडून घेतल्यास किंवा वापरल्यास तुमच्यावर कारवाई होऊ शकते. अशी कारवाई करण्यासाठी पालिकेने निरीक्षकांची २२५ जणांची फौज तयार केली आहे. त्यापैकी दुकाने आणि आस्थापना विभागातील १०७ निरीक्षकांची नावे पालिका प्रशासनाने संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहेत. हे निरीक्षक दुकानदारांवर कारवाई करतील, तर मार्केट आणि परवाना विभागातील निरीक्षकांची नावेही लवकरच जाहीर केली जाणार आहेत. पालिकेच्या मंडई आणि फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे.

No comments:

Post a Comment