तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 6 June 2018

शुक्रवार रोजी रिपाईची महत्त्वपुर्ण बैठक - अध्यक्ष किशोर कांडेकर

सुभाष मुळे...
-------------
गेवराई, दि. 6 __ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थित महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे, या बैठकीला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन तालुकाध्यक्ष किशोर कांडेकर यांनी केले आहे.
        बैठकीत भिमा-कोरेगाव येथिल दंगलीचा मुख्य सुत्रधार संभाजी भिडे यास तातडीने अटक करण्यात यावी, अॅक्ट्रासिटी कायदा अधिक तिव्र व सक्षम करून त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी, गायरान जमीनी नावे करण्यासाठीच्या जाचक अटी रद्द करण्यात याव्यात, ग्रामसभा व ग्राम पंचायतच्या घरकुलाला ठराव देण्याची अट रद्द करण्यात यावी, शहरी भागातील गोर-गरीबांना विना अट घरे उपलब्ध करून देण्यात यावी, विद्यार्थांच्या शिष्यवृतीत वाढ करून विना विलंब विद्यार्थांच्या खात्यावर जमा करण्यात यावी, मागासवर्गीयांच्या सर्वच महामंडळास निधी उपलब्ध करून द्यावा, आदि मागण्यासाठी येत्या 29 जूनला बीड येथे काढण्यात येणार्या विराट मोर्चाच्या तयारी साठी दि. 8 जून 2018 शुक्रवार रोजी सकाळी 10 वाजता गेवराई येथील विश्रामगृह येथे महत्वपुर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले असुन, या बैठकीस युवा प्रदेश अध्यक्ष पप्पुजी कागदे हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
     या बैठकीस सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन रि.पा.ई गेवराई तालुकाध्यक्ष किशोर कांडेकर यांनी केले आहे.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
-----------------------------------
--- जाहिरात व बातमी करिता संपर्क ----
------------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯

No comments:

Post a Comment