तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 8 June 2018

महामंडळाचा नवा प्रस्ताव, निलंबन कारवाईनंतर संघटनेचा कडक इशारा.


१ जून रोजी घोषित केलेली वेतनवाढ कर्मचाऱ्यांना मान्य नसेल तर ती रद्द करण्यात यावी आणि औद्योगिक  न्यायालय जो निर्णय घेईल तो कर्मचाऱ्यांनी मान्य करावा. १ जून रोजी केलेली दरवाढ रद्द झालीतर एसटीची भाडेवाढ देखील करावी लागणार नाही, एसटी महामंडळाचा दिवाकर रावते यांच्याकडे प्रस्ताव आलाय. यावर काय निर्णय होणार याकडे लक्ष लागलेय. दरम्यान, एसटी परिवहन महामंडळ संघटनेने पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर सरकारने अधिसूचना जाहीर केलीय. प्रवासी वाहतुक सुरळित ठेवण्यासाठी सरकारने काहीउपाय योजना या अधिसुचनेच्या माध्यमातून सुचवल्या आहेत..त्यानुसार राज्यातील सर्व खाजगी वाहातूक बसेस, स्कुल बसेस, कंपनी मालकीच्या बसेस, मालवाहु वाहन यांना प्रवासी वाहातूक करण्याची मान्यता अधिसुचनेच्या माध्यमातून देण्यात आली आहे. संप मागे घेतल्यानंतर ही अधिसूचना रद्द होणार आहे

No comments:

Post a Comment