तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 14 June 2018

आष्टी शहरातील भिक मागून उपजिवीका करणाऱ्या व्यक्तींना अन्नदान करुन वाढदिवस साजरा करणार - राजेंद्र लाड


बाळू राऊत
मुंबई : आष्टी जे का रंजले गांजले,त्यांसी म्हणे जो आपुले,तोचि साधु ओळखावा,देव तेथेची जाणावा या उक्तीप्रमाणे आष्टी शहरातील गरीबीने त्रासलेले वेडेसरपणाने त्रासलेले,अंधत्वानेअपंगत्वाने भिक मागून आपली नियमीत भटकंती करुन शिळे पाके भिक मागून खाणारे,रुपया दोन रुपये मागून जगणारे व्यक्ती यांना आज माझ्या 42 व्या वाढदिवसानिमित्त जेथे भेटतील तेथे अन्नदान करुन माझा वाढदिवस मी साजरा करणार आहे.तसेच माझ्या वाढदिवसानिमित्त मला काही भेट न देता माझ्या गरीब भिक मागून उपजिवीका करणाऱ्या बांधवांना तसेच माझ्या आदर्श दिव्यांग बंधु - भगिनींना आर्थिक मदत करावी तसेच गरीब होतकरु शालेय विद्यार्थ्यांना आदर्श व्यक्तींची पुस्तके देवून मदत करावी असे आवाहन दिव्यांग कर्मचारी संघटनेचे बीड जिल्हा सचिव तथा राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक राजेंद्र लाड यांनी केले आहे.
राजेंद्र लाड यांना सन 2016 या वर्षीचा बीड जिल्हा परिषदेचा जिल्हा शिक्षक पुरस्कार व महाराष्ट्र शासनाचा राज्य शिक्षक पुरस्कार मिळालेला असून त्यांनी आजपर्यंत दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अनेक उपक्रम राबवून त्यांना शासनाच्या अनेक सोयी - सवलती मिळवून दिलेल्या आहेत.तसेच ते स्वतः दिव्यांग असतांना देखील दिव्यांग संघटनेच्या माध्यमातून दिव्यांगांचा जनता दरबार आयोजित करुन अधिकारी व पदाधिकारी यांना उपस्थित ठेवून अनेक प्रश्न निकाली काढलेले आहेत.तसेच दिव्यांगत्वावर मात करुन सदृढ शिक्षकाला लाजवेल असेच शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम केलेले आहे.
तसेच शौचालय बांधा अन् पाचशे एक रुपये मिळवा हा एक अनोखा व स्वच्छतेच्या दृष्टीने महत्त्वाचा उपक्रम राबवून दिव्यांगांना आर्थिक मदत केलेली आहे.तसेच आष्टी शहरातील शासकीय कार्यालयांना संविधान दिनाचे औचित्य साधून संविधान प्रास्ताविकेच्या प्रतिमा भेट दिलेल्या आहेत.पाणी फाऊंडेशनच्या वाँटर कप स्पर्धेतील सहभागी गावांना भेटी देवून दिव्यांग असतांना देखील श्रमदान करुन स्वतःच्या दुचाकीवर पाण्याविषयी घोषवाक्य लिहून पाण्याविषयी प्रचार व प्रसार केलेला आहे.तसेच सर्वधर्म समभावाची जपवणूक व्हावी या उद्देशाने सध्या सुरु असलेल्या रमजान या पवित्र महिण्यामध्ये दोन दिवसाचे रोजाचे उपवास धरुन दिव्यांगांना अच्छे दिन यावेत यासाठी दुवा मागितली आहे.
नेहमीच सामाजिक,धार्मिक व शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या सर्वगुणसंपन्न दिव्यांग शिक्षक राजेंद्र लाड यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!!!

No comments:

Post a Comment