तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 14 June 2018

विहिरीत पोहल्याने २ मुलांना नागडं करुण मारहाण, दोन्ही आरोपींना अटक.


विहिरीत पोहले या शुल्लक मातंग समाजाच्या दोन मुलांना नागडं करून बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेचा आरोपींनी व्हिडीओ बनवला आणि नंतर गावातून धिंड देखील काढली. या प्रकरणी पोलिसांनी २ जणांना अटक केली असून त्यांची नावे ईश्वर जोशी (भटके जोशी) आणि प्रल्हाद लोहार अशी आहेत. महाराष्ट्राला शरमेने मान खाली घालायला लावणारी ही धक्कादायक घटना वाकडी गावातील मराठी शाळेजवळ कर्णफाट्यावर रविवारी सकाळी दहा वाजता घडली. बुधवारी मध्यरात्री संबंधित दोन जणांना विरुद्ध पहूर पोलिसांत अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाकडी गाव ता.जामनेर येथील रहिवासी मातंग समाजाच्या महिला दुर्गाबाई सांडू चांदणे यांचा मुलगा सचिन चांदणे व पुतण्या राहुल चांदणे हे रविवारी पोहण्यासाठी ईश्वर बळवंत जोशी यांच्या शेतातील विहीरीवर गेले होते. या शुल्लक कारणावरून ईश्वर बळवंत जोशी व प्रल्हाद उर्फ सोन्या लोहार या दोघांनी सचिन व राहुल यांच्या अंगावरचे कपडे काढून त्यांना नागडं केलं. गुप्तांग झाकण्यासाठी या दोघांना झाडाची पानं देण्यात आली आणि त्यांना पाईपच्या आणि काठीच्या सहाय्याने बेदम मारहाण करण्यात आली. बुधवारी या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर ही घटना जगासमोर आली.

No comments:

Post a Comment