तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 10 June 2018

तुरा येथे शेतकरी बचत गट मेळावा व मार्गदर्शन शिबीर संपन्न.

प्रतिनिधी

पाथरी:-तालूक्यातील तुरा येथे शेतकरी बांधवांसाठी स्वराज्य प्रतिष्टाणच्या  वतीने दि. 10 जून रोजी सकाळी  9 वाजता हनुमान मंदिरासमोरील सभागृहा मध्ये शेतकर्‍यासाठी भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी शेतकर्‍यांना जन्मभुमी फाउंडेशनचे अध्यक्ष तथा पं स सदस्य सदाशिव थोरात यांनी गट शेती, विष मूक्त शेती , कमी खर्चात अधिक उत्पन्न ,अध्यावत तंत्रज्ञान , अशा अनेक विषयावर मोलाचे मार्गदर्शन दिले.

सलग तिन वर्ष शेतकरी अस्माणी , सूलतानी संकटात सापडला असून शेतीचे अर्थचक्र बिघडल्यामुळे शेतकरी अर्थिक संकटात सापडला  आहे. खर्च जादा उत्पादन कमी  या मूळे शेतकरी आत्महत्याचा मार्ग अवलंबवत असल्याने  शेतकर्‍यांना गट शेती, विषमूक्त शेतीचे अध्यावत तंत्रज्ञान , झीरो बजेट शेतीचे मार्गदर्शन , निसर्गाचे लहरी चक्र या पासून शेतीचे रक्षण करूण अधिक ऊत्पन्न कसे मिळेल व शेतक-याचे जिवनमान कसे सुधारेल यासाठी तालुक्यातील तुरा येथे धनंजय आडसकर यांच्या वतिने शेतकरी बचत गट मेळावा व मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते  या वेळी जन्मभुमि फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा पं स सदस्य सदाशिव थोरात यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले .
आज खरे तर शेतकरी बांधवांनी अत्याधुनिक शेती क्षेत्राकडे वळले पाहीजे.  शेतात काय पिकतय त्यापेक्षा बाजारात काय विकतय याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे थोरात यांनी सांगितले यावेळी तालुक्यातील प्रगतशिल शेतकरी गजानन घुंबरे  यांची प्रमुख उपस्थिती होती.

या बचत गट मेळाव्यासाठी शेतकर्‍याची मोठ्या संख्येने उपस्थित होती.  यावेळी मिलिंद मनेरे यांनी सुत्रसंचासन केले तर आभार धनंजय आडसकर यांनी मानले.

No comments:

Post a Comment