तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 8 June 2018

सेनगाव तहसिलला सहा महिन्यापासुन राँकेल मिळत नसल्याची तक्रार

विश्वनाथ देशमुख सेनगावकर

सेनगाव:- शहरातील प्रभाग क्रमांक 12 मधील रहिवाशी माजी संचालक कृ.ऊ.बा.समिती देविदास नारायण फटागंळे यांनी सहा महिन्यापासुन राशन दुकानदार राँकेल देत नसल्याचे निवेदन दि.08 जुन शुक्रवार रोजी तहसिलदार वैशाली पाटील यांना दिले आहे.
सेनगाव तालुक्यात माघील सहा महिन्यापासुन राँकेलचा पुरवठाच होत नसल्याच्या तक्रारीत दिवसेंदिवस वाढत असुन याकडे तहसिल प्रशासनाचे जाणीवपुर्वक दुर्लक्ष होत असल्याचे पाहावयास मिळत आहे.सेनगाव शहरासह तालुक्यात दुचाकी,चारचाकी वाहनाला लागेल तेवढे राँकेल मिळत असुन यामुळे प्रदुषणात वाढ होत आहे.सेनगाव तालुक्यातील सामान्य जनतेला सहा महिन्यापासुन राशन दुकानदार राँकेल का देत नाहीत.राँकेल काळ्या बाजारात तर विक्रीला जात नसावा?हा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे.सेनगाव येथील रहीवाशी माजी संचालक देविदास फटागंळे यांनी सेनगाव तहसिलला निवेदन देऊन माघील सहा महिन्यापासुन राँकेल मिळत नसल्याचे निवेदन देऊन सहा महिन्याचे राँकेल देण्यात यावे अशी मागणी केली आहे.तरी वरिष्ठ अधिका-यांनी वेळीच लक्ष देऊन सेनगाव तालुक्यात राँकेलचा पुरवठा त्वरीत सुरळीत करावा अशी मागणी सामान्य जनतेतुन होत आहे.

No comments:

Post a Comment