तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 6 June 2018

आढळले चार हजार वर्षापूर्वींच्या योद्धा समाजाचे अवशेष.


भारतीय संस्कृती प्राचीन काळी किती पुढारलेली होती, नागरीकरण कसं होतं, जगातल्या अन्य संस्कृतींच्या इतकी प्राचीन भारतीय संस्कृती आहेका अशा अनेक प्रश्नांबद्दल अनेक मतं व्यक्त होत असतात. परंतु आता पुरातत्व खात्याच्या हाती लागलेल्या पुराव्यावरून एक गोष्ट निश्चित स्पष्ट होत आहे ते म्हणजे चार हजार वर्षांपूर्वी भारतामध्ये रथ होते, तलवारी होत्या, शिरस्त्राणं होती, खंजीरासारखी शस्त्रे होती आणि विशेष म्हणजेही सगळी युद्धामध्ये लागणारी शस्रसंपदा तांबे व कास्य धातूंपासून बनवण्याची कला तत्कालिन भारतीयांनी साधली होती.उत्तर प्रदेशातील बाघपत मधल्या सिनौली येथे पुरातत्व खात्याला कास्य युगातील म्हणजे तब्बल 4000 वर्षांपूर्वीच्या या वस्तू सापडल्या आहेत.गेले तीन महिने या जागी उत्खनन सुरू असून नुकतीच याबद्दलची माहिती पुरातत्व खात्यानं दिली आहे. तलवारी व खंजीरांसारख्या गोष्टींवरून त्या काळातया भागातील समाज योद्धा होते हे स्पष्ट होते. या उत्खननामध्ये एकूण आठ शव पुरण्याच्या जागा आढळल्या आहेत. कला कुसर केलेल्या अनेक वस्तू, तीन शवपेटिका, मोठ्या तलवारी, खंजीर, कंगवे आदी गोष्टी उत्खननात आढळल्या आहेत. शव पुरलेल्या जागी तीन रथआढळले असून राजघराण्यातील व्यक्तिंच्या दफनाची शक्यता सूचित होत आहे. या ठिकाणी आढळलेल्या सगळ्या गोष्टी तत्कालिन समाज योद्धा होता असे दर्शवतात असे पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्याने सांगितले.
“विशेषत: रथाच्या सापडण्यामुळे प्राचीन अशा अन्य संस्कृतींशी, नागरीकरणाशी नाळ जोडली जाते. मेसापोटेमिया, ग्रीस आदी देशांमध्येही रथांचा वापर याच सुमारास मोठ्या प्रमाणावर होत होता. या प्रदेशांमध्ये योद्धा समाज मोठ्या प्रमाणावर राहत होता असे मानण्यास जागा आहे,” पुरातत्व खात्याच्या उत्खनन विभागाचे सहसंचालक एस चे मंजूल यांनी सांगितले. सदर उत्खनन हे अत्यंत उत्साहवर्धक असून शवपेटिंकावर तांब्याची पिंपळाचं पान असलेली कलाकुसर आहे, जे राजघराण्यातील दफन दर्शवतं असं मंजूल म्हणाले. पानाफुलांची नक्षी असलेली या प्रकारची शवपेटिका भारतीय उपखंडात प्रथमच मिळालीआहे. हडप्पा, मोहेंजोदरो, ढोलाविरा इथेही शवपेटिका आढळल्या होत्या, परंतु त्यांच्यावर कलाकुसर नव्हती, असे निरीक्षण मंजूल सांगतात.या पुराव्यांमुळे भारतीय समाज चार हजार वर्षांपूर्वी किती प्रगत होता हे दिसत असल्याचं मंजूल म्हणाले. ज्यावेळी मेसापोटेमिया मध्ये रथ, तलवारी, ढाली व शिरस्त्राण होती, त्याच सुमारास भारतातही या सगळ्या गोष्टी होत्या हे आता निश्चितपणे सांगता येईल. याखेरीज, मातीची व तांब्याची भांडी, कंगवे, तांब्याचे आरसे आदी गोष्टी आढळल्या असून या तत्कालिन समाजाचं राहणीमान दर्शवतात. या भागातल्या गोष्टी व हडप्पायेथे आढळलेल्या गोष्टींमध्ये साम्य नसल्याचे सांगताना दोन्ही संस्कृती व वंश वेगळे असल्याचे मत मंजूल यांनी व्यक्त केले आहे.

No comments:

Post a Comment