तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 13 June 2018

भुजबळ साहेबांबद्दल अपशब्द काढाल तर याद राखा- ऍड. सुभाष राऊत

फौजदार जाधवला तात्काळ निलंबीत करण्याची समता परिषदेची मागणी

बीड (प्रतिनिधी)ः- सूर्याला कितीही झाकण्याचा प्रयत्न केला तरी तो उगवतोच, गेली अडीच वर्ष राजकीय वैमनस्यातून ओबीसीचे राष्ट्रीय नेते तथा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आ. छगनराव भुजबळ यांना तुरुंगात डांबून ठेवण्यात आले. मात्र जामीन मिळताच ओबीसीचा बुलंद आवाज पुन्हा राज्यात घुमू लागला आहे. असे असतांना श्रीगोंदा पोलिस स्टेशनचा पोलिस उपनिरीक्षक महावीर जाधव याने आ. भुजबळ साहेबांबद्दल अपशब्द वापरले आहेत. त्याला तात्काळ निलंबीत करुन त्याच्यावर कडक कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा देवून यापुढे जर कोणी आ. छगनराव भुजबळ साहेबांबद्दल अपशब्द काढले तर त्याला समता सैनिक माफ करणार नाहीत असा परखड इशाराही समता परिषदेचे बीड जिल्हाध्यक्ष ऍड. सुभाष राऊत यांनी दिला आहे. 

या बाबत जिल्हाधिकारी बीड यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अहमदनगर जिल्ह्यातील कोसेगव्हाण (ता.श्रीगोंदा) येथील माजी उपसरपंच श्री.भीमराव बापुराव नलगे यांना शुक्रवार दि. 08 जून 2018 पहाटे 2 : 59 वाजता श्रीगोंदा पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक महावीर जाधव यांनी घरी जावून दमदाटी करीत अर्वाच्या भाषेत शिवीगाळ केली. तसेच काहीही संबंध नसतांना माजी उपमुख्यमंत्री आ. छगनराव भुजबळ साहेबांच्या नावाने अत्यंत खालच्या भाषेत अवमानकारक अपशब्द वापरुन तमाम ओबीसी समाजाच्या भावना दुखविल्या आहेत. पोलिस उपनिरीक्षक महावीर जाधव याला तात्काळ निलंबीत करुन त्याच्यावर कडक कार्यवाही करावी. तसेच या पुढे कोणीही आ. भुजबळ साहेबांबद्दल अपशब्द वापरल्यास लोकशाही पध्दतीने तीव्र आंदोलन करुन त्याला चोख उत्तर दिले जाईल असा परखड इशाराही ऍड. सुभाष राऊत यांनी दिला आहे. 

या निवेदनावर ऍड. सुभाष राऊत यांच्यासह ऍड. संदीप बेदरे, रणजीत पाटील, समता परिषदेचे शहराध्यक्ष निखील शिंदे, नितीन राऊत, माळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष धनंजय काळे, मनोज भानोसे, फुले ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संदीप येलदाळे  महात्मा फुले युवा दलाचे जिल्हा उपाध्यक्ष पंकज साळुंके, शहराध्यक्ष नागेश सत्वधर, अनिरुध्द काळे, वैभव गोरे, गोरख साळुंके,  नितीन नन्नवरे, विलास सरदे, सचिन झेंडे, रंगा अडागळे आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत. 

No comments:

Post a Comment