तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 5 June 2018

सोन्याचे दागिने चोरणारे दोघे अटकेत, दोघांपैकी एकजण पत्रकार.


पिंपरी-चिंचवड शहरात एका पत्रकारानेच दिल्लीवरून सराईत गुन्हेगाराला बोलावून सोनसाखळी हिसकावण्याचे प्रकार सुरु केले होते.हा पत्रकार हा पिंपरी-चिंचवड मधील एका स्थानिक वाहिनीचा असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मौजमजा आणि झटपट पैसे कमावण्याच्या हव्यासापोटी दुचाकीवरून पायी चालणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी याचा साथीदार चोरत असे. वाकड पोलिसांनी त्याला आणि त्याच्या साथीदाराला अटक केली असून त्यांच्याकडून अडीच लाख रुपये किमतीचे सव्वा आठ तोळ्यांचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत.नसीम सादिक उस्मानी (वय ३२,रा.जगताप नगर थेरगाव) असे या पत्रकाराचे नाव असून त्याचा साथीदार मोहम्मद शराफतहुसेन अली (वय २४ रा बिजानोर उत्तरप्रदेश) हा सराईत गुन्हेगार असून यांना वाकड पोलिसांनी अटक केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पिंपरी-चिंचवड शहरात ‘शबनम न्युज’ या नावाचे स्थानिक वाहिनी असूनयाच वाहिनीच्या पत्रकार (प्रतिनिधी) नसीम सादिक उस्मानी याने दिल्ली वरून एका सराईत गुन्हेगार असलेल्या मोहम्मद शराफत हुसेन अली याला पिंपरी-चिंचवड शहरात बोलावून घेऊन संगनमताने सोनसाखळी चोरण्याचे प्रकार सुरु केले.गेल्या चार महिन्यापासून ते पादचारी महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास करत आणि हे दोघेही दुचाकीवरून धूम ठोकत होते.या प्रकरणी वाकड पोलिसांच्या नाकी नऊ आणले होते. वाकड पोलिसांच्या हद्दीत ऐकून पाच गुन्हे उघडकीस झाले असून त्यांच्याकडून सव्वाआठ तोळे सोन्याचे दागिने असा ऐकून २ लाख ४५ हजार रुपये किंमतीचा माल हस्तगत केला आहे. मोहम्मद अली यांच्यावर दिल्ली येथे सोनसाखळी चोरी प्रकरणी गुन्हे दाखल आहेत.

No comments:

Post a Comment