तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 6 June 2018

पालम येथे करिअर व रोजगार मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

अरुणा शर्मा

पालम :- विद्यार्थीचे आयुष्य घडविणारे तथा दिशा दाखविणारे अचूक आणि प्रभावी मार्गदर्शन करिअर व रोजगार मार्गदर्शन शिबिर दिनांक 7 जून सकाळी 11 वाजता गजानंद मंगल कार्यालय येथे आयोजीत करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक प्रा. नितीन बानगुडे पाटील (जनप्रिय वक्ते) आजचा युवक आणि उद्याचे भवितव्य असा विषय असून व इंजि. शिवाजीराजे पाटील (प्रदेशाध्यक्ष, संत गाडगेबाबा प्रबोधन कक्ष) स्पर्धा परीक्षांमधील संधी, डॉ. प्रभाकर हारकळ (व्याख्याते व मार्गदर्शक) युवक व उद्योजकता, सौ. रूपाली कानगुडे (प्रकल्प अधिकारी एम.सी.ई.डी.परभणी) या सर्व वक्तेचे मार्गदर्शक लाभणार आहे. तर निमंत्रक डॉ. संजय कदम आधार हॉस्पिटल हे आहेत दिनांक 7 जून रोजी हा कार्यक्रम व धोंडे जेवनाचा सुधा कार्यक्रम ठेवले असून जास्तीत जास्त विद्यार्थी व नागरीकानी हजर राहून धोंडे जेवन करावे असे अव्हान डॉ. संजय कदम यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment