तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 11 June 2018

रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते तीन हजार एकशे एक नव वधु वरांचा सत्कार व जावयाला दिली धोंडे जेवन

अरुणा शर्मा

पालम :- गंगाखेड शुगरचे चेअरमन  रत्नाकर गुट्टे यांनी गंगाखेड मतदारसंघातील तीन हजार एकशे एक नवदांपत्याचा संहप्तनीक आहेर देऊन सत्कार केला.व आपल्या लेकी प्रमाणे तीन हजार एकशे एक जावयांना धोंडे जेवन देऊन यथोचित स्वागत केले. गंगाखेड शुगर च्या वतीने दिनांक 9 जून रोजी गजानन मंगल कार्यालय पालम येथे नव दांपत्याच्या सत्काराचे आयोजन रासपाचे नेते तथा गंगाखेड शुगर चे चेअरमन रत्नाकरराव गुट्टे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभाकरराव सिरस्कर (अण्णा) हे होते. व्यासपीठावर जि.प. सदस्य गणेशराव रोकडे (दादा), किशनराव भोसले, राजेश फड, राजू पटेल, लक्ष्मणराव मुंडे, राम लटके, अँड. संदीप पाटील, राधाकिशन शिंदे, सत्यपाल साळवे, दत्तराव जवळेकर, सिताराम राठोड,मगर पोले, संभाजी वाकोळे, इस्माईल भाई, कृष्णा सोळंके, अण्णासाहेब किरडे आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना रत्नाकर गुट्टे म्हणाले की माझ्या जावाया प्रमाणे माझ्या मतदार संघातील जावायांना अधिक मास महिण्या निमित्त सामाजिक जिव्हाळा म्हणून धोंडे जेवण देऊन त्यांचा यथोचित्त सत्कार केला. यावेळी जि.प.सदस्य गणेशराव रोकडे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमा नंतर तीन हजार एकशे एक नवदांपत्याचा रा.स.प. नेते रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते संपत्तीसाठी साडी कपडे आहेर देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रा. स.प. चे जिल्हाध्यक्ष अँड. संदीप पाटील, पालम तालुकाध्यक्ष साहेबराव सुरनर, नवनाथ हत्तीअंबिरे, विनायक पौळ, भगवान सिरस्कर, ताहेरखाँ पठाण, बालाजी वाघमारे, गणेश दुधाटे व गंगाखेड शुगर चे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला पालम, गंगाखेड, पुर्णा या तीनही तालुक्यातून नवदांपत्य व रा.स.प. चे नेते रत्नाकर गुट्टे मित्र मंडळाचे कार्यक्रते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पदुदेवा जोशी यांनी केले तर आभार पालम तालुका अध्यक्ष साहेबराव सुरनर यांनी मानले.

No comments:

Post a Comment