तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 12 June 2018

भाजी विक्रेत्याला १ कोटीची लॉटरी लागली, पण क्षणात स्वप्न भंगली.


छोटी-मोठी स्वप्न बघत लाखो लोक लॉटरीची तिकिटं तिकीटं खरेदी करतात, स्वप्न रंगवतात.पण अशा साऱ्या स्वप्नांचा एका क्षणात चुरडा करणारी एक घटना समोर आली आहे. एका भाजी विक्रेत्याला १ कोटी ११ लाखाची लॉटरी लागली आणि त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला. पण प्रत्यक्षात जेव्हा रक्कम घेण्यास तो पोहोचला तेव्हा आपल्याजवळ असलेलं तिकीट हे खोटं असून अन्य दोन जणांकडे देखील याच क्रमांकाची तिकिटं आहेत असं त्यांला कळालं आणि त्याच्या स्वप्नांचा क्षणात चुरडा झाला. अखेर बनावट लॉटरी प्रकरणी त्यांनं आवाज उठवला असून पोलिसात तक्रार दाखल केली आहे. नालासोपारा येथे राहणारे आणि भाजी विकणारे सुहास कदम हे अत्यंत मेहनती व्यक्ती. पण मेहनती सोबतच ते नशिबाची साथही घेत असतात. आपलं नशीब आजमवण्यासाठी गेली पाच वर्ष लॉटरीची तिकीटं खरेदी करत आहेत. यामध्ये त्यांना २०० पेक्षा अधिक रक्कम याआधी कधीही जिंकता आलेली नाही. मात्र १६ मार्च रोजी त्यांनी कल्याण रेल्वे स्थानकाच्या बाहेरील एका लॉटरी विक्रेत्याकडून १०० रुपयांची पाच तिकीटं खेरीदी केली. या लॉटरीचा निकाल २० मार्च रोजी लागला आणि त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. कारण पाच पैकी एक तिकीट असं होतं ज्या क्रमांकाला१ कोटी ११ लाख रुपयांची लॉटरी लागली होती. त्यांनी ही गोष्ट घरच्या मंडळींना सांगितली. सारेच खूश झाले.ही बातमी वाऱ्याच्या वेगानं त्यांच्या गावापर्यंत पोहोचली. त्यांचे अभिनंदन करण्यासाठी कोकणातून त्यांच्या घरी आले. पण प्रत्यक्षात लॉटरीची रक्कम घेण्यासाठी ते राज्य लॉटरी विभागात पोहोचले असता तोच क्रमांक असलेले अन्य दोन दावेदार तेथे आले होते. अखेर तपास केला असता सुहास कदम यांच्याकडे असलेले तिकीट बनावट असल्याचे सिद्ध झाले. ज्या व्यक्तीच्या तिकिटावर योग्य बारकोड होता त्याला विजयी घोषित करण्यात आले. त्यामुळे सुहास नाराज झाले. आपल्या प्रमाणेच इतरांची देखील अशी फसवणूक होऊ नये म्हणून त्यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.मुंबईत ४००० च्यावर अधिकृत लॉटरी तिकीट विक्रेते आहेत. तब्बल १५ कोटी रुपयांच्या तिकीटांचा खप होतो. आर.बी.आय मार्फत ही तिकीटे नियंत्रित केली जातात. त्यामुळे अधिकृत विक्रेत्याकडून घेतलेल तिकीट खोटं कसं असू शकतो, असा सवाल कदम व त्यांचा परिवाराला पडला आहे.दरम्यान, हा प्रकार गंभीर असून याची तक्रार दाखल करून घेण्यात आली आहे. याचा तपास घेण्यात येत आहे, अशी माहिती महात्मा फुले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकांत धरणे यांनी दिली.

No comments:

Post a Comment