तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 13 June 2018

राहुल फटांगडेच्या हत्येप्रकरणी फरार आरोपीला अटक.


भीमा-कोरेगांमध्ये उसळलेल्या दंगलीनंतर राहुल फटांगडे नावाच्या तरुणाची जात्यंध दंगेखोरांनी हत्या केली होती. यातील दोन आरोपी पुणे पोलिसांना सापडत नसल्याने त्यांनी व्हिडीओच्या आधारे फोटोग्राफ मिळवून ते राज्यभर प्रसिद्ध केले होते. या फोटोंमुळे एक आरोपी पकडण्यात आला असून त्याचे नाव सूरज शिंदे असल्याचं सांगण्यात येत आहे. सूरज हा सोलापुरातील टेंभूर्णीचा रहिवासी असल्याची माहिती देण्यात आली आहे.१ जानेवारी रोजी शौर्यदिनाच्या पार्श्वभूमीवर भीमा-कोरेगाव येथे लाखो नागरिक अभिवादन करण्यासाठी आले होते. त्यावेळी या भागात दंगल भडकली असताना पेरणे फाटा येथील पेट्रोलपंपापासून काही अंतराकर राहुल बाबाजी फटांगडे (३०, रा. कान्हून मसाई,ता. शिरूर) याने शिवाजी महाराज यांचे चित्र असलेला शर्ट घातल्याने त्याला जमावाने अडवून दांडक्यांनी बेदम मारहाण केली. त्याच्या डोक्यात दगड घातल्याने त्याचा मृत्यू झाला होता हे पोलीस तपासामध्ये यापूर्वी सामोर आले आहे.राहुल फटांगडेच्या खूनप्रकरणी यापूर्वी तिघांना अटक केली आहे. यातील दोघे जण नगरचे आहेत तर एकजण संभाजीनगर येथील आहे. त्यांच्याकिरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. फटांगडेच्या खून प्रकरणात आणखी चौघांचा सहभाग आहे. त्यांची नावे, माहिती सीआयडीला देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवून त्यास योग्य बक्षीसही दिले जाईल असे सीआयडीच्या पुणे विभागाचे पोलीस अधीक्षक प्रसाद अक्कानवरू यांनी जाहीर केले होते.

No comments:

Post a Comment