तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 31 July 2018

काकासाहे शिंदे यांच्या दशक्रियाविधी शांततेत संपन्न तर कायगाव पूल वाहतुकीसाठी सुरू

संपत रोडगे गंगापुर प्रतिनिधी
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जलसमाधी घेतलेल्या काकासाहेब शिंदे यांचा दशक्रिया विधी १ ऑगस्ट रोजी कायगाव घाटावर  संपन्न झाले या विधीसाठी सर्व धर्मीय नागरिक या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच या मार्गावरील वाहतूक दशक्रिया विधी संपन्न होण्यापर्यंत बंद ठेवण्यात आले होते हा निर्णय ग्रामीण विभागाच्या पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी घेतला होता. या मार्गावरील सर्व वाहने बिडकीन, ढोरकीन, शेवगाव मार्गे वळविण्यात आली  असल्याने या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली नाही

मराठा आरक्षणासाठी सध्या राज्यभर आंदोलने सुरूआहेत. यादरम्यान २३ रोजी काकासाहेब शिंदे या युवकाने कायगाव टोका पुलावरून उडी मारून गोदावरी नदीत जलसमाधी घेतली. त्यानंतर राज्यभर आंदोलक आक्रमक होऊन हिंसक वळण लागले. मृत काकासाहेब शिंदे यांचा दशक्रिया विधी १ ऑगस्ट रोजी कायगाव घाटावर होणार होते. या दशक्रिया विधीला औरंगाबाद जिल्ह्यातून आणि राज्यातून मराठा समाजबांधव मोठ्या प्रमाणात आले होते तसेच मोठ्या प्रमाणात वाहने येणार असल्याने  वाहतुकीची कोंडी होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नाही त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून डॉ. आरती सिंह यांनी पुलावरील संपूर्ण वाहतूक बंद ठेऊन  या मार्गावरील वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळविण्यात आली होती. औरंगाबाद मार्गे अहमदनगरकडे जाणारी वाहने बिडकीन, ढोरकीन-पैठण, शेवगाव-पांढरी पूल मार्गे अहमदनगरकडे जातील तर अहमदनगरकडून औरंगाबादकडे येणारी वाहने पांढरीपूल-शेवगाव-पैठण, ढोरकीन, बिडकीन मार्गे औरंगाबादला  वळवण्यात आली होती.

*गोदावरी नदीवरील पुलाला हुतात्मा काकासाहेब शिंदे ह्या नावाने नामकरण करण्यात आले नामकर हे विधिवत पूजन

रोटरी क्लब हा सामाजिक उत्तरदायित्व पुर्णत्वास नेणारी संघटना - रो. घुले


प्रा. डॉ. संतोष रणखांब
तेजन्यूज हेडलाईन्स प्रतिनिधी
सोनपेठ :  रोटरी क्लब म्हणजे सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावने मधून निर्माण झालेली संघटना असून कुठल्याही नफ्या तोट्याचा विचार न करता मला समाजाला काही चांगले दिले पाहीजे. इतरांना अडचणीच्या वेळी मदत केली पाहीजे या भावनेने कार्य करायला शिकवाणारी संघटना असल्याचे मत रो. संजय घुले यांनी व्यक्त केले. यावेळी रो. हरिष मोटवाणी, रो. जनार्दन राव, रो. महेंद्र खंडागळे,  रो. माधव वलसे, मा. आ. व्यंकटराव कदम यांच्यासह अनेक मान्यवर रो. प्रदीप गायकवाड यांच्या पदग्रहण सोहळ्याच्या निमित्ताने कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित होते.
शहरातील बालाजी मंदिरात नूतन अध्यक्षांचा पदग्रहण सोहळ्याच्या निमित्ताने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी रोटरी क्लबने मागील वर्षभरात केलेल्या कामाचा अहवाल माजी अध्यक्ष बालमुकुंद सारडा यांनी वाचन केला. त्यानंतर मान्यवरांनी मार्गदर्शन केले. मार्गदर्शनात हरिष मोटवाणी, जनार्दन राव,  यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तसेच नुतन अध्यक्ष रो. प्रदीप गायकवाड व सचिव रो. इंजि. चंद्रकांत लोमटे यांच्याकडे पदभार सोपवण्यात आला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. जाधव व संदिप लष्करे यांनी केले तर आभार नुतन अध्यक्ष प्रदीप गायकवाड यांनी मानले. रोटरी क्लबच्या सर्व सदस्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

अपत्कालीन परिस्थतीत स्वताचा जीव धोक्यात घालुन विद्यार्थ्यांचे प्राण वाचविले

परळी तालुक्यातील सचिन आंधळे यांचा सत्कार
परळी दि.31
    परळी तालुक्यातील मांडवा येथील शिक्षण घेतलेल्या नागापुर शहरातील परिमंडळ क्रं.4 अंतर्गत पोलिस स्टेशनचे पोलिस शिपाई सचिन आंधळे यांचा मंगळवारी नागापुर येथे झालेल्या अतिवृष्टीत अडकलेल्या शालेय विद्यार्थ्यांना स्वताचा जीव धोक्यात घालुन सुखरुप बाहेर काढल्याबद्दल परळीत सत्कार करण्यात आला. यावेळी  सचिन आंधळे यांच्या जिगरबाज व उल्लेखनिय कार्याचाबद्दल नवगण कॉलजचे प्रा.डॉ.मधुकर आघाव, संदिप कराड यांनी सत्कार केला.
    सचिन आंधळे यांनी प्रशासनीय कामगिरी केल्याबद्दल नागपुरचे पोलिस आयुक्त डॉ.के.वेंकटेशम् यांनी प्रशंसापत्र देऊन सत्कार केला आहे.  अतिवृष्टीमुळे दि.07 जुलै रोजी आदर्श संस्कार विद्यालयाची बस पाण्यात बुडाली होती. विद्यार्थ्यांना बोटीने सुरक्षित स्थळी पोहोंचविण्यात आले. पोलिस उपायुक्त यांनी आपल्या ताफ्यातील पोलिसांसोबत नागरिकांच्या मदतीसाठी पुलाच्या पाण्यात शिरुन पलीकडे दोर घेऊन पाहोंचले व त्यांनी कलंडलेल्या बस मधुन विद्यार्थ्यांना नागरिकांच्या मदतीने बाहेर काढले. व दुसर्‍या बसमध्ये बसवुन सुरक्षीत स्थळी पाहोंचवले. पोलिस  उपायुक्त निलेश भरणे व त्यांच्या कर्मचार्‍यांनी जिव धोक्यात घालुन मुलांचे प्राण वाचविले. यावेळी परळी तालुक्यातील मांडव्याच्या सचिन आंधळे यांनी आपल्यया जिवाची परवान करता मदत कार्य केले.

  ╭════════════╮
   ▌प्रतिनिधी : महादेव गित्ते -
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 9403921114
              संपर्क ः- 9623921114
                     ╰════════════

परळीत चौदाव्या दिवशी तहसील कार्यालया समोर ठिय्या आंदोलन चालुच नाशिक, सिन्नर, पुण्यातील कार्यकर्त्यांनी घेतली आंदोलकांची भेट


परळी दि.31
    मराठा समाजाला आरक्षण द्यावे व शासनाची मेगा भरती रद्द करावी या दोन प्रमुख मागण्यासह अन्य मागण्यांसाठी मराठा क्रांती ठोक मोर्च्याच्या वतीने येथील तहसील कार्यालय समोर दि.18 जुलै पासुन सुरु असलेले ठिय्या आंदोलन चौदाव्या दिवशीही चालुच होते. मंगळवारी दुपारी नाशिकचे माजी आमदार  अ‍ॅड.माणिकराव कोकाटे यांनी  आंदोलनास भेट देऊन जाहिर पाठिंबा दिला आहे.  यावेळी त्यांच्या सोबत नाशिक, सिन्नर येथील कार्यकर्ते होते. तसेच पुणे जिल्ह्यातुनही कार्यकर्ते आंदोलनस्थळी दाखल झाले आहेत.
    मंगळवारी दुपारी चार च्या दरम्यान पावसाने हजेरी लावली. आंदोलन स्थळी भाषणे चालुच होती.  मंडप असल्याने  पावसाचा तेवढा  परिणाम झाला नाही. परळीचे उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, तहसीलदार शरद झाडके आज दुपारी आंदोलन स्थळी जावुन आंदोलकांशी चर्चा केली. व आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. जोपर्यंत आरक्षण जाहिर होत नाही. व मेगा भरती रद्द केली जात नाही. तोपर्यंत आंदोलन चालुच राहील. असा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केला.
    पुण्याचे आबासाहेब पाटील हे चौदा दिवसापासुन परळीच्या तहसील समोरील ठिय्या आंदोलनात सहभागी असुन आंदोलनाचे नेतृत्व करीत आहेत. त्यांच्या सोबत महेश डोंगरे (सोलापुर), विवेकानंद बाबर (सातारा), संजय सावंत (औरंगाबाद), सुनिल नागणे, (तुळजापुर) व परळी येथील मराठा समाजातील तरुण, महिला, पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत. कांहीजण आंदोलन स्थळीच मुक्काम करीत आहेत. याठिकाणी दोन टाईम जेवणाची व्यवस्था परळीतील समाजबांधवाकडुन करण्यात आलेली आहे. अनेक लोकप्रतिनिधींनी आंदोलनास भेट देऊन आंदोलकांशी संवाद साधला आहे.
    तहसील परिसरात हे ठिय्या आंदोलन दि.18 जुलै पासुन चालु आहे. तेव्हांपासुन अंबाजोगाईचे अतिरिक्त जिल्हा पोलिस अधिक्षक अजित बोराडे, अंबाजोगाईचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश गायकवाड हे तळ ठोकुन आहेत. तसेच चोख पोलिस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. परळी शहरात शांततेत ठिय्या आंदोलन चालु आहे.
    पुणे जिल्ह्यातील चाकण येथे सोमवारी आरक्षण प्रश्‍नी हिंसक वळण लागले. आंदोलनानंतर कांहीजणांनी एस.टी. व खाजगी बसेस तसेच शिवशाहीच्या बसेसची जाळपोळ केली. याबद्दल मराठा ठोक मोर्चाचे राज्यसमन्वयक आबासाहेब पाटील चिंता व्यक्त केली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने सुरु केलेल्या शिवशाही बसची केलीली जाळपोळ ही आंदोलकांनी केली नसुन त्यां पाठीमागलचे आरोपी दुसरेच असावेत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी पाटील यांनी केली. तसेच आंदोलनाची दिशा परळीतुन ठरलेली असल्याने परळीशी संपर्क साधावा नंतरच आंदोलन करावे असा सल्लाही पाटील यांनी दिला आहे. मराठा आरक्षणाप्रश्‍नी ठोस निर्णय त्वरीत घ्यावा, विशेष अधिवेशन शासनाने बोलवावे अशी मागणीही त्यांनी केली.
   
      ╭════════════╮
   ▌प्रतिनिधी : महादेव गित्ते -
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 9403921114
              संपर्क ः- 9623921114
                     ╰════════════

ना.पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्तभाजपच्या वतिने विद्यावर्धिनी विद्यालयात होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

परळी/प्रतिनिधी

राज्याच्या ग्रामविकास व महिला बालकल्याण मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त आज सोमवार दि.30 जुलै रोजी विद्यावर्धिनी विद्यालय येथे 51 गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

नविन शक्तीकुंज वसाहतीतील विद्यावर्धिनी विद्यालय येथे आज सोमवार दि.30 जुलै रोजी राज्याच्या ग्रामविकास मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून 51 गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे जेष्ठ नेते दत्ताप्पा इटके गुरुजी तर प्रमुख पाहुणे म्हणून वैद्यनाथ बॅंकेचे व्हा.चेअरमन विनोद सामत, माजी नगराध्यक्ष वैजनाथ जगतकर, माजी नगरसेवक कमलाकर हरेगावकर, अनिल तांदळे, नरसिंग सिरसाट हे उपस्थित होते. याप्रसंगी दत्ताप्पा इटके गुरुजी यांनी शालेय साहित्य वाटप मागची भूमिका सांगितली. आपल्या कर्मभूमीतील लोकांबद्दलच्या आपुलकीपोटी हे समाज ऋण फेडण्याचा हा छोटासा प्रयत्न करत आहोत असे सांगितले. कार्यक्रमास संस्थेचे सचिव  पी.जी.इटके, सदस्य भिंगोरे, एम.टी. मुंडे व पैंजणे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन बालाासाहेब हंगरगे यांनी केले तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक उन्मेष मातेकर यांनी केले. कार्यक्रमास विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  ╭════════════╮
   ▌प्रतिनिधी : महादेव गित्ते -
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 9403921114
              संपर्क ः- 9623921114
                     ╰════════════

परळी तालुक्यात स्त्री जातीचे अर्भक पाण्यावर मृतावस्थेत तरंगताना आढळून ; अज्ञात महिलेवर खुनाचा गुन्हा


परळी : मौजे नागदरा येथील तळ्यात खोदलेल्या शासकीय विहिरीत दि. २६ एप्रिल रोजी नुकतेच जन्मलेले स्त्री जातीचे अर्भक पाण्यावर मृतावस्थेत तरंगताना आढळून आले होते. या दुर्दैवी बाळाला मारून विहिरीत फेकल्याचे वैद्यकीय अहवालातून निष्पन्न झाल्याने या प्रकरणी अखेर आज (दि. ३१) रोजी अज्ञात महिलेवर परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला.

परळी तालुक्यातील नागदरा येथील पोलीस पाटील प्रकाश धोंडीराम नागरगोजे यांना दि. २६ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास गावाजवळील तळ्यात खोदलेल्या शासकीय विहिरीत अंदाजे २-३ दिवसापूर्वी जन्मलेले स्त्री जातीचे अर्भक पाण्यावर मृतावस्थेत तरंगताना आढळून आले. त्या बाळाला पाण्यातील माश्यांनी आणि खेकड्यांनी हाता-पायाला कुरतडलेले होते. याची खबर नागरगोजे यांनी तातडीने परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली होती. या प्रकरणाचा तपास सहा. पोलीस निरीक्षक सपकाळ यांच्याकडे होता. परंतु, सपकाळ यांची बदली झाल्याने पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेश चाटे यांच्याकडे देण्यात आला होता. दि. ३० जुलै रोजी या प्रकरणात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या अभिप्रायावर चाटे यांनी वरिष्ठांचे मार्गदर्शन घेतले आणि नवजात अर्भकाचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी पाण्यात टाकल्याप्रकरणी अज्ञात महिलेवर आज परळी पोलीस ठाण्यात कलम ३०२, २०१ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला.

कामाला वेग, मागासवर्गीय आयोगाच्या 5 संस्थांकडून सर्वेक्षण पूर्ण.


__________________________________

राज्यभरात तीव्र होत असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनानंतर आरक्षणासाठी सरकारने वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत. तर, राज्य मागासवर्गीय आयोगानेही याकामी गती पकडली आहे. राज्यात मराठा आरक्षणासाठी राज्य मागासवर्गीय आयोगाच्या 5 संस्थांकडून सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. राज्यातील 5 विभागातील 5 संस्थांकडून हे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. त्यामुळे लवकरच या संस्थांकडून सर्वेक्षणाचा अहवाल मागासवर्गीय आयोगापुढे ठेवण्यात येईल.मराठा समाजाचे राज्यात तीव्र आंदोलन सुरू असून आत्तापर्यंत 7 जणांनी आत्महत्ये सारखे टोकाचे पाऊल उचलले आहे. तर अनेक जिल्ह्यात हिंसाचाराच्या घटनाही घडल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने बैठका घेत मागावर्गीय आयोगाकडे काही सूचना आणि विनंती केली. त्यानुसार मागासवर्गीय आयोगानेही मराठा आरक्षणाचा अहवाल सादर तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु केले आहे. त्यासाठी राज्यातील विविध 5 विभागांतून सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. दरम्यान,मराठा आरक्षणाचा मुद्दा हा भाजप सरकारचं निकाली काढणार आहे. आयोगाच्या अध्यक्षांनी आपलं काम सुरू केलं असून मराठा आरक्षणाचा कायदा हा आमच्या सरकारनेच केल्याचे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. मुंबईतल्या राजाराम महाराजांच्या कार्यक्रमात त्यांनी याबाबत माहिती दिली. काही लोक म्हणतात अध्यादेश काढून आरक्षण जाहीर करा, पण तसं केल्यास ते आरक्षण एक दिवसही टिकणार नाही. मराठा आरक्षणासाठी कायदेशीर बाबी पूर्ण कराव्या लागतील, राज्य सरकार या बाबी निश्चित पूर्ण करणार आहे, असेही फडणवीसांनी स्पष्ट केले आहे.

आठ जणांचा अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न.

_________________________________

लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील टाका गावच्या आठ तरुणांनी तहसील कार्यालयात अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी उपस्थित पोलिसांनी आंदोलकांना मज्जाव केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. त्यानंतर हे आंदोलक मराठा आरक्षणाची मागणी करीत औसा तहसील कार्यालयात प्रचंड घोषणाबाजी करत घुसले. या आंदोलकांनी लातूरच्या जिल्हाधिकाऱ्याना याबाबतचे निवेदनही देण्यात आले होते. मात्र राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत ठोस निर्णय अद्यापही न घेतल्याने टाका गावच्या तरुणांनी आत्मदहनाचा निश्चय केला. आठ मराठा आंदोलकानी अंगावर रॉकेल ओतून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. यावेळी आंदोलकाना उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते, तहसीलदार अहिल्या गाठाळ तसेच डीवायएसपी गणेश किंद्रे यांनी शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतर ही बराच वेळ आंदोलकांनी तहसील कार्यालयातच ठिय्या आंदोलन केलं. यावेळी उपविभागीय अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्याने आक्रमक आंदोलकानी तहसीलदार यांच्या दालनातील ठिय्या आंदोलन मागे घेतले.

देशातील रोहिंग्यांची नोंद करा, हालचालींवर लक्ष ठेवा - केंद्रीय गृहमंत्री.


__________________________________

देशात ज्या ज्या राज्यांमध्ये रोहिंग्या आहेत त्यांची गणना करावी, त्यांना एकत्रित करावं आणि त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवावं असे आदेश राज्यांना देण्यात आल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी लोकसभेत दिली. रोहिंग्याबाबत लोकसभेत चर्चा करण्यात आली. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. याखेरीज बांग्लादेशमध्ये रोहिंग्यांबाबत इन्सानियत मोहिम राबवली जात आहे तशी आपण राबवणार का असा प्रश्न तृणमूल काँग्रेसचे सुगाटा बोस यांनी उपस्थित केला. यावर केंद्रीय राज्य गृहमंत्री किरण रिजिजू यांनी बोस यांचं विधान दुर्दैवी असून रोहिंग्यांबाबत नरमाईची भूमिका घेणारा भारत हा एकमेव देशअसल्याची शक्यता वर्तवली.

घाटकोपर मध्ये अमली पदार्थ(ड्रग्स) च्या विक्रीचे आणि ते सेवन करून होणाऱ्या गुन्हेगारीचे प्रमाण वाढले


मुंबई : दि.३१ कमी दिवसात जास्त पैशांच्या लालसेने काही समाजकंटक समाजात नशेचा व्यवसाय करतात. याला काही जण बळीही पडतात. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, यात तरुणाईचा समावेश असल्याचे आढळून आले. चरस किंवा गांजा, ड्रग्स (हिरोइन) या सारख्या नशा उत्पन्न होणाऱ्या पदार्थांची घाटकोपर मध्ये नशा विकण्याचा हा गोरखधंदा सुरु आहे.यामुळे आयुष्याची होते राखरांगोळी
घाटकोपर मध्ये गेल्या काही महिन्यात अमली पदार्थ(ड्रग्स) च्या विक्रीचे आणि ते सेवन करून होणाऱ्या गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.ही विक्री काही ठिकाणी अगदी खुले आम होत असताना घाटकोपर पोलीस ठाणे या बाबत कारवाई का करीत नाहीत?असा प्रश्न सर्व सामान्य नागरिकांना पडला आहे.त्यामुळे आता घाटकोपर मधील सामान्य जनतेमध्ये भीतीचे सावट निर्माण झाले आहे .अथवा घाटकोपर गुन्हेगारीचा अड्डा होण्याची शक्यता आहे.या अमली पदार्थ विक्री आणि ते सेवन करणाऱ्या गर्दुल्यांच्या विरोधात पोलिसानी कडक कारवाई करावी अशी येथील जनतेची मागणी आहे .

खेडकर महाविद्यालयात मतदार ओळखपत्र शिबिर संपन्न

तेल्हारा :(विशाल नांदोकार)स्थानिक डॉ. गोपाळराव खेडकर महाविद्यालयात महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षा निमित्त तहसिल कार्यालय तेल्हारा व राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मतदार ओळखपत्र शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.महाविद्यालयात प्रवेशित विद्यार्थ्यांकडून  मतदार ओळखपत्र काढण्यासाठी तहसिल कार्यालयाच्या वतीने फार्म भरून घेण्यात आले. या शिबिरात महाविद्यालयाचे अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.  यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे जेष्ठ प्राध्यापक आर. व्ही. देशमुख , प्रमुख मार्गदर्शक म्हणून विजय सुरडकर नायब तहसिलदार निवडणूक विभाग, प्रा. डॉ. कृष्णा माहुरे राज्यशास्त्र विभाग प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नंदकुमार पंचाग यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विशाल बरिंगे,सचिन ढोले, स्वप्निल फोकमारे, तायडे यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे आयोजन तेल्हारा तहसिलचे तहसिलदार डॉ. संतोष यावलीकर  व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष तराळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

सतिष पाटील सावके यांच्या प्रयत्नांना यश

मंगरुळपीर-तालुक्यातील शेलुबाजार येथे विद्युत कार्यालयात गेल्या 13 महिन्या पासुन कनिष्ठ अभियंता हे पद रक्त असल्यामुळे नागरिकांना खुप ञास होत होता.हि बाब शिवसेनेचे सतिश पाटील सावके यांना कळताच त्यांनी अधिषक अभियंता विभागीय कार्यालय वाशीम यांना निवेदन देऊन जर कायमस्वरुपी कनिष्ठ अभियंता न दिल्यास अधिशक अभियंता विभागिय कार्यालय वाशीम  समोर दि.31जुलै  रोजी  उपोषण करण्याचा इशारा दिला होता.आज या उपोषणा अधिशक अभियंता विनोद वैधैरीया साहेब यांनी लवकरात लवकर रिक्त जागेवर कनिष्ठ अभियंता देऊ.प्रश्न निकाली लागल्याने शिवसेनेचे सतीश पाटील सावके यांच्या उपोषणाची सांगता करण्यात आली.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007835

मराठा आंदोलकांनी लातुरात नारायण राणेंचा पुतळा जाळला

लातूर:-लातूर येथील मराठा समाजाच्या बैठकीसंदर्भात नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करीत लातूर मराठा क्रांतीने थेट नारायण राणे यांचा पुतळा जाळला. पुतळा जाळण्यापूर्वी पुतळ्यास आंदोलकांनी जोडेही मारले.

लातुरात मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने मराठा क्रांतीच्या जिल्हा समन्वयकांची राज्यस्तरीय बैठक घेण्यात आलेली होती. या बैठकीच्या दिवशीच मुख्यमंत्र्यांनी मराठी समाजातील कांही प्रतिनिधींची बैठक सह्याद्री अतिथीगृहावर घेतलेली होती. त्या बैठकीस उपस्थित राहणाऱ्या सदस्यांचाही लातुरात निषेध करण्यात आलेला होता.

नारायण राणे यांनी वक्तव केले होते की, ‘लातूरची बैठक कोणी अ‍ॅथोराईज केली? सरकारने सांगितले का त्यांनी सांगितलेल्याच लोकांना बैठकीला बोलवा. लातूरच्या बैठकीतील लोकांना काही अधिकारी नाही, आम्हीही मराठा समाजाचे आहोत, आम्हाला अधिकार आहे, कायदे माहीत नसतील तर त्यांना माझ्याकडे येऊन शिकायला सांगा.’ या वक्तव्याचा तिव्र निषेध करीत लातूरात मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने नारायण राणे यांच्या पुतळयास जोडे मारुन त्यांचा पुतळा जाळण्यात आला.