तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 3 July 2018

परळीत 11हजार युनिट विजचोरी करणाऱ्यां तिघांवर गुन्हे दाखल.

परळी(प्रतिनिधी)शहरातील तीन विज ग्राहकांनी रिमोटच्या सहाय्याने मिटर बंद करून 11हजार युनिट विजेची चोरी केल्याचे भरारी पथकाच्या तपास मोहिमेत उघड झाले असुन या तिघावर महावितरण कंपनीने पोलीसांत गुन्हा दाखल केला असुन सदर घटनेने विज चोरी करणारांचे धाबे दणाणले आहे.
शहरातील शेख सलाउद्दीन यांनी 8हजार424युनिट,मोहन मोरे यांनी 3हजार131युनिट तर श्रीमान बडे यांनी 350युनिट विजेची चोरी इलेक्ट्राँनिक मिटर रिमोटव्दारे बंद करून केल्याचे कंपनीच्या भरारी तपासणी पथकाच्या तपास मोहिमेत उघड झाले असुन या पथकाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता मधुकर साळवे यांच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशनला या तिघा विरूध्द 201240 रूपयांची विज चोरी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर विजचोरी पकडल्याने विजेची चोरी करणाऱ्यांचे धाबे मात्र दणाणाले.

No comments:

Post a Comment