तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 3 July 2018

परळीत लिपीकास मारहाण प्रकरणी ; 39 जणावर गुन्ह दाखल


परळी दि.०३
शहरातील नाथ रोडवरील सर्व्हे नंबर ४९९ मधील परळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेतील अतिक्रमण काढीत असतांना बाजार समितीचे लिपीक रमेश गोपीनाथ मुंडे यांना आडवुन शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी देत शासकीय कामात अडथळा आणला. हा प्रकार दि.३० जुन पुर्वी घडला, या प्रकरणी दि.०२ जुलै रोजी रमेश मुंडे यांनी परळी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यावरुन ३९ जणांविरोध सोमवारी रात्री ११.३० च्या सुमारास शासकीय कामात अडथळा आणल्याच्या आरोपाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मंगळवारी सायंकाळ पर्यंत कोणालाही अटक झाली नव्हती. 

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्व्हे नंबर ४९९ मध्ये गैर कायद्याची मंडळी जमुन दि.२८ नोव्हेंबर २०१७ ते ३० जुन २०१८ दरम्यान  शेड ठोकून झोपडपट्टी उभा करण्याचा प्रयत्न केला. ती जागा कृषी उत्पन्न बाजार समितीची आहे. त्यामुळे लिपीक रमेश गोपीनाथ मुंडे व इतर कर्मचारी अतिक्रमणे करु नका असे सांगु लागले व अतिक्रमणे काढीत असतांना ३९ जणांनी अडवुन मारहाण केली व शासकीय कामात अडथळा आणला अशी फिर्याद परळी शहर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली. त्यावरुन ३९ रहिवांश्या विरुध्द परळी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

३९ जणां मध्ये दिपा धुराजी मस्के, शांताबाई नामदेव गायकवाड, मुक्ता ज्ञानोबा कांबळे, इंदु गुलाब जाधव, जयश्री शिवाजी खरात, गया आदोडे, कांता नरेश जाधव, भगीरथी जनार्धन सरवदे, पार्वती सर्जेराव मस्के, संतोषी प्रकाश गिरी, केरुबाई विठ्ठल पूरी, भारतबाई पूरी, आशा नागनाथ घोडके, दैवशाला दासुराव रोडे, सत्यभामा निवृत्ती ढगे, लता कुंडलिक इंगळे, कविता संभाजी गोदाम, गोविंद ज्ञानोबा केंद्रे, शेख जुबेर शेख जब्बर, निता गोदाम, अनुसया सावंत, महानंदा पूरी इंदुबाई गिरी, सुनिता पांडुरंग फड, निर्मला कांबळे, शारदा शिंदे, मंदिराबाई कांबळे, सुनिता अशोक गायकवाड, पुजा बालाजी गायकवाड, ललिता संतोष गायकवाड, नंदा कृष्णा क्षीरसागर, अशोक गायकवाड, सटवा तुकाराम जाधव, किरण रमेश शिंदे, अशोक संभाजी गवळी, विलास गरड, अंजना दत्ता आरबुने, रोहिणी बंडु विखे यांच्यासह इतरांचा समावेश आहे. 

याप्रकरणाचा तपास परळी शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक देविदास शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकांत डोंगरे, बापु लांडगे हे करीत आहेत.  

शहरातील नाथरोड वरील राजीव गांधी नगरातील घरे वाचविण्यासाठी आलेल्या महिलांनाही मारहाण करण्यात आली. याप्रकरणी बाजार समितीच्या संबंधीतावर कार्यवाही करावी अशी मागणी राजीव गांधी नगरातील महिलांनी परळी शहरचे पोलिस निरीक्षक देविदास शेळके यांनी भेट घेऊन केली आहे. राजीव नगरातील रहिवांश्यावरील परळी बाजार समितीकड ुन होणारा अन्याय दुर करावा व उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशाचे पालन व्हावे यासाठी पोलिस प्रशासनाने हस्तक्षेप करावा अशी मागणीही यावेळी एका शिष्टमंडळाने केली आहे. या शिष्टमंडळात रिपाईचे राजीव सचिव भास्करराव रोडे, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष सुर्यंकांत मुंडे, शहराध्यक्ष बाबु नंबरदार, युवक कॉंग्रेसचे परळी विधानसभा अध्यक्ष प्रा.विजय मुंडे, एकतावादी रिपाईचे जिल्हा सरचिटणीस पंडित झिंजुर्डे, भारिप बहुजन महासंघाचे मिलिंद घाडगे, अभियंता भगवान साकसमुद्रे, विश्‍वनाथ देवकर, किशोर जाधव, अशोक गायकवाड आदि उपस्थित होते. 

शहरातील नाथरोडवरील स्नेह नगर जवळील परळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेत गेल्या अनेक वर्षापासुन राहत असलेल्या नागरिकांची अतिक्रमणीत घरे बाजार समितीने कांही दिवसापुर्वी  पोलिस बंदोबस्त उठवली होती. त्यानंतर येथील नागरिकांनी न्यायालयात धाव घेतली आहे.

No comments:

Post a Comment