तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 5 July 2018

तिरुपती बालाजी मंदिर 5 दिवस बंद.


__________________________________

देशातच नव्हे तर जगभरातील भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या तिरुपती बालाजीच्या दर्शनाला जाण्यासाठी नियोजन करत असल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. या वर्षात पाच दिवस तिरुपती बालाजीचे दर्शन भक्तांना घेता येणार नाही. यंदाच्या वर्षी ऑगस्ट महिन्यात तिरुपती बालाजी मंदिर पाच दिवस बंद ठेवण्याचा विचार तिरुमला तिरुपती देवस्थान (टीटीडी) करत आहे. मंदिर बंद ठेवण्यामागे धार्मिक कारण आहे. प्रत्येक 12 वर्षांनी ‘अघमास’ येतो त्यालाच ‘अस्ताबंधना बाललया महासंपरोकषनाम’ असे देखील म्हटले जाते. हा ‘अघमास’ यंदा 12 ते 16 ऑगस्ट या काळात होणार आहे. सर्वसाधारपणे तिरुपती मंदिरात प्रत्येक दिवशी 30 ते 35 हजार भक्त दर्शनासाठी येतात. पण ‘अघमास’ दरम्यानच्या सर्व पूजा आणि दर्शन बंद ठेवण्याचा विचार टीटीडी करत आहे. त्यामुळे भक्तांनी दर्शनासाठी येण्याचे नियोजन करताना याचा विचार करावा, असे ‘टीटीडी’ने म्हटले आहे. देवस्थानाने या आधीच 12 ते 16 ऑगस्ट रोजी होणाऱ्या सर्व अर्जिता सेवा रद्द केल्या आहेत. पुढील महिन्यात होणाऱ्या हा धार्मिक विधी 1958 पासून केला जातोय. प्रत्येक 12 वर्षांनी होणारी ही विशेष पूजा असते. तिरुपती बालाजी आणि त्यांच्या कुटुंबाला दिर्घ आयुष्य मिळावे, अशी प्रार्थना या पूजेत केली जाते. असे मानले जाते की या काळात तिरुपती बालाजी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सर्व शक्ती एका पात्रात जमा होते. या काळात हे पात्र यज्ञ शाळेत ठेवले जाते. सर्व भक्तांनी दर्शनासाठी येताना देवस्थानाने आयोजित केलेल्या धार्मिक विधीच्या तारखा लक्षात घेऊनच नियोजन करावे, असे आवाहन ‘टीटीडी’च्या संयुक्त कार्यकारी अधिकाऱ्याने केले आहे. ‘महासंपरोकषनाम’ची तयारी 20 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान केली जाणार आहे.

No comments:

Post a Comment