तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 7 July 2018

प्रलंबित शिष्यवृत्तीचे अर्ज निकाली काढण्यासाठी शिबिराचे आयोजन · 9 ते 13 जुलै 2018 दरम्यान सामाजिक न्याय भवन येथे होणार शिबिर


बुलडाणा, दि. 07 : शैक्षणिक सत्र 2017-18 अंतर्गत अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण व परीक्षा शुल्क उपरोक्त प्रवर्गाच्या प्रलंबित शिष्यवृत्ती अर्जांचा निपटारा करण्यात येणार आहे. या मागास प्रवर्गातील प्रथम वर्षाचे मोठ्या प्रमाणावर अर्ज अद्यापही महाविद्यालयांकडून समाज कल्याण कार्यालयास सादर करण्यात आलेले नाही. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना लाभ देता आलेला नाही.

शिबिराचे आयोजन 9 ते 13 जुलै 2018 दरम्यान सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, चिखली रोड, बुलडाणा येथे करण्यात आले आहे. त्यानुसार 9 जुलै 2018 रोजी बुलडाणा तालुक्यासाठी, 10 जुलै रोजी चिखली, दे.राजा, सिं. राजा तालुक्यांकरीता, 11 जुलै रोजी लोणार, मेहकर व मोताळा तालुक्यांसाठी, 12 जुलै 2018 रोजी मलकापूर, नांदुरा व खामगांवसाठी, 13 जुलै रोजी शेगाव, संग्रामपूर व जळगांव जामोद तालुक्यांकरीता शिबिर असणार आहे.

शैक्षणिक वर्ष सन 2017-18 मधील प्रथम वर्षाचे व नुतनीकरणाचे अर्ज सहाय‍क आयुक्त, समाज कल्याण कार्यालयास सादर नाही करतील व पात्र मागासवर्गीय विद्यार्थी योजनेच्या लाभापासून वंचित राहल्यास, त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांची राहील. महाविद्यालयाच्या मान्यतेची सर्व कागदपत्रेसुद्धा सदर कार्यालयास वर्षनिहाय सादर करावी व उपरोक्त तारखेस सर्व महाविद्यालयांनी अर्ज सादर करावीत. तसेच कोणताही मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता प्रचार्यांनी घ्यावी, असे सहायक आयुक्त मनोज मेरत यांनी कळविले आहे.

No comments:

Post a Comment