तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 4 July 2018

तेल्हारा शहरातील लाईन राञी एक तास बंद;अधिकारी यांचे दुर्लक्ष

प्रतिनिधी
तेल्हारा:--तेल्हारा शहरातील लाईन राञी एक तास बंद पडल्यामुळे ग्राहकांची गैरसोय कंपनीचे लाखोचे नुकसान पावसाळ्यापुर्वी मेन्टन्सची कामे सुरळीत न केल्यामुळे ३३/११ केव्ही सबस्टेशन मध्ये असलेले ए.बी.स्विच बसत नसल्यामुळे ग्राहकांना एक तास अंधारात राहण्याची वेळ संमधीत अधिकारी यांचे दुर्लक्षीत पणामुळे ग्राहकांना अंधारात राहण्याची वेळ येत असुन शहरातील लाईन जाने नित्यनियमच झाला आहे लाखो रुपय मेन्टन्स करण्याकरीता येतात परंतु मेन्टनस न करता कागदावरच कामे केल्याचे दाखविल्या जातात असाच प्रकार कि काय हे शहरातील नेहमी होत असलेल्या खंडीत पुरठ्यावरुन दिसुन येते  शहराला विद्युत पुरवठा करण्याकरीता ३३/११केव्ही यार्ड आहे यार्डमधील देखभाल दुरुस्तीचे कामे पावसाळ्या पुर्वी करायला पाहीजे जेणेकरुन लोकांना सदोष विद्युत पुरवठा केल्या जाईल तसेच कंपनीची जनमानसत प्रतिमा मलीन होणार नाही व कंपनीचा लाखो रुपयाचा महसुल बुडणार नाही यांची दक्षता संमधीत अधिकारी यांणी घ्यायला पाहीजे परंतु तेल्हारा शहरातीचे व कंपनीचे काही घेणे देणे नसनारे अधिकारी असे प्रकार घडत आहेत तरी या प्रकाराची चौकशी करुन दोषी अधिकारी यांचेवर कार्यवाही व्हावी व राञी १०.०० ते ११.००पर्यंत बंद असल्यामुळे त्यांचे कडुन कंपनीचा महसुल वसुल करावा जेणेकरुन पुन्हा नागरीकांची गैरसोय होणार नाही
यासंदर्भात शहर अभियंता आशीष गुप्ता यांचे सोबत संपर्क साधला असता लाईनवर झाड पडल्याचे सांगीतले परंतु अधिक चौकशी केली आसता लस्तुस्थिती वेगळीच होती त्यामुळे दोषी अधिकारी व खोटी माहीती देणाऱ्या अभियंत्यावर  कार्यवाही करावी जेणेकरुन कंपनीची प्रतिमा सुधारेल  
शहर अभियंता आकाश गुप्ता उपकार्यकारी अभियंता सचिन कोहाळ हे नागपुरचे असल्यामुळे बरेचवेळा हे दोन्हीही अधिकार एकमेकासोबत तळजोड करुन कार्यभार चालवितात अश्या प्रकारची चर्चा जनमानसात आहे

No comments:

Post a Comment