तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 3 July 2018

ना. पंकजाताई मुंडे, खा. डाॅ प्रितमताई मुंडे यांच्या पुढाकाराने संपूर्ण बीड जिल्हा होणार मोतीबिंदूमुक्त

अभियानाला आजपासून परळी तालुक्यातील धर्मापूरी येथून प्रारंभ ; गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानचा सक्रिय सहभाग

परळी दि. ०३ ----- राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे आणि खासदार डाॅ प्रितमताई मुंडे यांनी संपूर्ण बीड जिल्हा मोतीबिंदूमुक्त करण्याचा संकल्प केला असून या अभियानाची सुरवात उद्यापासून (ता. ०४) परळी व केज तालुक्यातून होणार आहे. शासनाच्या आरोग्य विभागा बरोबरच गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठाननेही यात सक्रिय सहभाग घेतला आहे. या अभियानांतर्गत डाॅक्टरांचे पथक स्वतः प्रत्येक गावांत जावून मोतीबिंदू रूग्णांची तपासणी करणार असून गरजू रूग्णांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

   शासनाच्या मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्र या अभियानांतर्गत बीड जिल्हयात    गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान, समता मेमोरियल फाऊंडेशन मुंबई, शासकीय  जिल्हा रूग्णालय बीड, जिल्हा आरोग्य अधिकारी बीड यांच्या वतीने मोतीबिंदूमुक्त बीड जिल्हा करण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे. जिल्हयाच्या पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे व खा डाॅ प्रितमताई मुंडे यांनी नुकतीच बीड येथे आरोग्य अधिका-यांची बैठक घेवून हे अभियान प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना केल्या. जिल्हयातील प्रत्येक गावांत, तांडा, वाडी वस्तीवर जावून मोतीबिंदू असलेल्या रूग्णांची तपासणी, औषधोपचार व शस्त्रक्रिया मोफत करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविण्यात येत असून त्यांनी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राना तशा सूचना दिल्या आहेत. 

धर्मापूरीतून प्रारंभ ; पहिल्या टप्प्यात २७ गावांत जाणार पथक
------------------------------
तालुक्यातील धर्मापूरी येथून मोतीबिंदूमुक्त अभियानाला उद्यापासून सुरवात होणार आहे. ०४ जूलै ते २५ जूलै दरम्यानच्या पहिल्या टप्प्यात तज्ज्ञ डॉक्टर्स व कर्मचा-यांचे पथक २७ गावांना भेटी देऊन मोतीबिंदू रूग्णांची तपासणी करणार आहेत. या रूण्गांची केवळ मोतीबिंदूच नाही तर इतर आवश्यक तपासण्या देखील हे पथक करणार आहे. तपासणी अंती निवडलेल्या रूग्णांवर परळीच्या उप जिल्हा रूग्णालयात मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. पुढील सहा महिने लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंती पर्यंत टप्प्याटप्प्याने हे अभियान संपूर्ण तालुक्यात राबविण्यात येणार असून प्रत्येक गावांत हे पथक जाणार आहे. 

   अभियानातील तज्ज्ञ डॉक्टर्स व कर्मचारी पथकाचा जूलै महिन्याचा दौरा पुढीलप्रमाणे - कंसातील तारीख शस्त्रक्रियेची आहे. ०४ जूलै धर्मापूरी, भोजनकवाडी (६ जूलै), ७ जूलै- गुट्टेवाडी, आनंदवाडी, नागदरा, दौंडवाडी (९ जूलै) ११ जूलै- दौंडवाडी तांडा, मैंदवाडी, मैंदवाडी तांडा, लाडझरी (१३ जूलै) १४ जूलै- हाळम, हेळम, खोडवा सावरगांव, दैठणा (१६ जूलै) १८ जूलै- मुरकूटवाडी, खोडवा सावरगांव लमाण तांडा, सारडगांव, नंदनज (२० जूलै) २१ जूलै- मिरवट, कासारवाडी, मरळवाडी, मांडवा (२३ जूलै) २५ जूलै- नंदागौळ, वसंतनगर, मोहदरा तांडा, लेंडवाडी, लेंडवाडी तांडा ( २६ जूलै)

गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानचा पुढाकार
------------------------------------
मोतीबिंदूचा एकही रूग्ण मोफत तपासणी व शस्त्रक्रिये पासून वंचित राहू नये तसेच हे अभियान प्रभावीपणे राबविले जावे यासाठी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानने पुढाकार घेतला आहे. ना. पंकजाताई मुंडे व खा डाॅ प्रितमताई मुंडे यांनी सर्व कार्यकर्त्यांना तशा सूचना केल्या असून डाॅक्टर्स व रूग्णांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी गांवोगांवच्या कार्यकर्त्यांची टीम सज्ज झाली आहे.
••••

No comments:

Post a Comment