मा.आ.बाबाजानी दुर्रानी साहेबांची विधानपरिषदेवर राकाँ कोट्यातून बिनविरोध निवड झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन आणि वाढदिवसा निमित्त तेजन्यूज हेडलाईन्स कडून हार्दिक शुभेच्छा...!

Wednesday, 4 July 2018

परळीत दर तासाला विज पुरवठा होतो खंडित महावितरणची मान्सुनपुर्व तयारी सपशेल फेल!


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  परळी शहरात विजेचा सातत्याने लपंडाव होत असून दर तासाला विज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. विजेचा लपंडाव थांबविण्यासाठी महावितरणकडून सकारात्मक प्रयत्न होत नसल्याने विज ग्राहकांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, मान्सुनपुर्व तयारीचा भाग म्हणून दिवसभर विज बंद करुनही महावितरणची ही तयारी सपशेल फेल गेली आहे. मंगळवारी सिंचन भवन फिडर बंद पडल्यानंतर काही भागात संपुर्ण रात्रभर विज पुरवठा खंडित होता. दुसऱ्या दिवशी सकाळी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करुन काही वेळापुरता विज पुरवठा सुरु केला. परंतु, फॉल्ट सापडत नाही असे कारण पुढे करीत विज बंद ठेवण्याची प्रक्रीया पुढे चालूच होती. हा प्रकार केवळ एका भागापर्यंत मर्यादीत नसून परळी शहरात दिवसभर विज पुरवठा अधुन-मधून खंडित होण्याची पद्धतच सुरु झाली की काय? अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
परळी शहरातील विज पुरवठा मागील काही दिवसांपासून सातत्याने खंडित होत असून “आता होती, आता नाही’ असे विज पुरवठ्याबाबत एक समिकरण रुढ झाले आहे. खरे पाहता मान्सुनपुर्व विज पुरवठा सतत कायम रहावा, यासाठी महावितरणने दिवसभर विज पुरवठा बंद करुन मोठे काम हाती घेतले होते. दुर्दैवाने महावितरणची मान्सुनपुर्व तयारी सपशेल फेल गेली आहे. वारा अथवा पाऊस असो किंवा नसो विज जाण्याचे प्रकार चांगलेच वाढत आहे. मागील काही दिवसांत सुरु झालेल्या विजेच्या लपंडावाबद्दल विज ग्राहकांतून मोठी नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. पावर हाऊससाठी असलेले लॅण्ड लाईन फोन मागेच बंद करण्यात आले असून फ्युज कॉलसाठी दिलेले मोबाईल क्रमांक सर्वांकडे नसल्याने तक्रार करायची तरी कोठे असे ग्राहकांतून बोलले जात आहे.
दरम्यान, परळी शहरात विज ग्राहकांना वापरलेल्या विजेचे बिलसुद्धा देण्याचे प्रमाण कमी झाले असून बिल येत नाही, आले तर ते रिडींग प्रमाणे नसते आणि सर्व काही योग्य असेल तर शेवटची तारिख निघून गेल्यावर बिल ग्राहकांच्या हाती दिले जाते. विजेच्या तक्रारीसोबत बिलाच्याही तक्रारी वाढत असतांना महावितरणकडून मात्र कोणत्याही उपाय योजना केल्या जात नाहीत. शहरात होणारा विज पुरवठा खंडित होत असतांना त्याच्या दुरुस्तीचेही प्रयत्न चांगल्या पद्धतीने होत नाही. रोजच विज जाते म्हणून नेहमीच तक्रारी करायच्या का? असाही सुर ग्राहकांत असून महावितरणच्या कार्यालयात किंवा फ्युज कॉलवर मात्र समाधानकारक उत्तरे मिळत नाहीत.

No comments:

Post a Comment