तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 3 July 2018

भोंदूबाबाच्या नादी लागली, घरात गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली.


राजधानी दिल्लीमध्ये अंधश्रद्धेतून एकाच कुटूंबातील ११ जणांनी आत्महत्या केल्याने देशभर खळबळ माजली होती. तसाच काहीसा प्रकार तामसा गावाजवळील एका महिलेच्या मृत्यूनंतर समोर आला. या प्रकरणी सात जणांविरुध्द खून आणि इतर सदरांखाली गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी एकाला अटक केली आहे. हदगाव न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील भोंदूबाबाचा पोलीस शोध घेत आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, तामसा गावाजवळ कोपरा गावातील विवाहित महिला गावाजवळील एकादर्ग्यात दर गुरुवारी जात असे. नेहमी-नेहमी तेथे जाऊन महिला काय पुजा-अर्चा, प्रार्थना आणि मार्गदर्शन घेतेय याबाबत महिलेच्या सासरच्या मंडळीला शंका आली. परंतु महिला नेमकी तेथे काय करते हा शोध लागण्या अगोदरच २६ जूनला तिचे प्रेत घरात लटकलेले होते. महिलेने भोंदूबाबाच्या नादी लागून आत्महत्या केल्याचा संशय तिच्या जवळच्या लोकांनी व्यक्त केला.दरम्यान, या प्रकरणी आत्महत्या केलेल्या विवाहितेचा भाऊ सय्यद लतिफ सय्यद पीर यांने दिलेल्या तक्रारीनुसार, महिलेचा नवरा नझीरखॉ वसीलखॉ पठाण (३०) याच्यासह कुटूंबातील इतर ५ आणि दर्ग्यातील भोंदूबाबा महंमद अलीबाबा शेख वझीर पठाण (५०) या लोकांनी माझ्या बहिणीचा विविध कारणांसाठी शारिरीक व मानसिक छळ करून तिला मारून टाकले आहे अशी तक्रार दिली. त्यानुसार तामसा पोलिसांनी कलम ३०२, ४९८ (अ) ३२३, ५०४, ५०६ आणि ३४ तसेच जादूटोणा अधिनियम कलम ३ आणि ४ नुसार गुन्हा दाखल केला. पोलिसांनी मयत विवाहितेचा नवरा नझीरखॉ वसीलखॉ पठाण यास अटक केली. दरम्यान, भोंदूगिरीचे दुकान चालविणारा अलीबाबा सध्या पळून गेलेला आहे. त्याचा पोलीस कसून शोध घेत आहेत.

No comments:

Post a Comment