तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 13 July 2018

जवाबदार अधिकारी नसल्याने तहसीलदारांच्या खुर्चीला निवेदन

सुभाष मुळे...
---------------
गेवराई, दि. १३ __ अनेक वर्षापासून शेतकरी संकटाशी सामना करत आहे. गतवर्षी कापूस पिकांवर पडलेली बोंडअळी च्या संकटामुळे शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला गेला आहे. यामुळे आत्महत्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. याची प्रशासनाने गांभिर्याने दखल घ्यावी. यासाठीचे निवेदन देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना अधिकारीच उपलब्ध नव्हता, परिणामी तहसीलदारांच्या खुर्चीला निवेदन सादर करावे लागले.
         गेवराई तालुक्यातील शेतकऱ्यांना NDRF अंतर्गत बोंडअळी नुकसान भरपाई किमान ७५ टक्के वाटप करावी, रब्बी २०१६ चा ३७ लाख रु.पीक विमा त्वरीत वाटप करावा, मुग सोयाबीन कापूस इ. पीकांचा विमा सर्व मंडळांना देण्यात यावा अशा व इतर मागण्यासाठीचे निवेदन तहसीलदार गेवराई यांना देण्यासाठी शेतकरी नेते डॉ. उद्धव घोडके यांच्या नेतृत्वाखाली गेवराई तालुक्यातील शेकडो शेतकरी गेले असता तहसील कार्यालयात एकही जबाबदार अधिकारी उपस्थित नसल्याने तहसिलदारांच्या खुर्चीला निवेदन देेेेण्यात आले. यावेळी डॉ.उद्धव घोडके, शरदराव आहेर, लक्ष्मणराव आहेर, अशोक वडघणे, अंजीर पवार, राजेंद्र धोत्रे, ओंकार रासकर, कीसन धोत्रे, साळुंके राम, तान्हाजी पराड, विठ्ठल बनाईत, अरूण तांबारे, अजय पंडीत, भागवत पवार, सांगळे रामकीसन, हनुमंत चिकणे, दत्तात्रय हात्ते, अभिमान पौळ यांसह शेकडो शेतकरी उपस्थित होते.
       गेवराई तालुक्यातील शेतकरी गेल्या चार पाच वर्षापासून संकटाशी सामना करत आहे. गतवर्षी मोठ्या प्रमाणात कापूस पिकांवर पडलेली बोंडअळी च्या संकटामुळे शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला गेला आहे. यामुळे आत्महत्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. याची प्रशासनाने गांभिर्याने दखल घ्यावी. यासाठीचे निवेदन गुरुवार रोजी शेतकरी नेते डॉ.उद्धव घोडके यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकरी गेले, मात्र तहसील कार्यालयाचे तहसिलदार यांसह नायब तहसीलदार देखिल गायब असल्याने शेवटी शेतकऱ्यांनी तहसिलदारांच्या कॅबीन मध्येच ठीय्या आंदोलन केले. निवेदन स्वीकारण्यास जबाबदार व्यक्ती नसल्याने शेवटी तहसिलदारांच्या खुर्चीलाच निवेदन देवून आगळे वेगळे आंदोलन केले. यावेळी डॉ. उद्धव घोडके यांनी दि.१ ऑगस्ट पासून शेतकऱ्यांचे साखळी उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती देखिल त्यांनी यावेळी दिली आहे.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯

No comments:

Post a Comment