तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 3 July 2018

अमरनाथ यात्रेकरूंना महाराष्ट्रीयन चव देणारे एकमेव महाराष्ट्रीन लंगर

विशाल नांदोकार
गेल्या दहा वर्षांपासून अमरनाथ यात्रेकरूंना महाराष्ट्रातील चवीचे भोजन देणारे एकमेव लंगर स्व सुरेश सखाराम देसाई यांनी  सुरूवात केली. सात वर्षे नित्तांत सेवा देत असतांनाच त्यांचे हृदय विकाराने निधन झाले त्यातच सर्व जबाबदारी त्यांच्या पत्नी शैला देसाई यांच्यावर येऊन पडली असतांना त्यांना काय करावे सुचत नव्हते यावेळी त्यांच्या सोबतींनी त्यांना धीर देऊन लंगर सुरूच ठेवले अनेक अडचणी आल्या, अनेक प्रकारचे त्रास झाले परंतु शैला देसाई यांनी भक्तांना सेवा देण्याची जिद्द सुरूच ठेवली. यावर्षी सुद्धा 23 जून पासून जम्मू येथील भगवती नगर येथे भाविकांना भोजन देने सुरू केले आणि जोपर्यंत भक्त येत राहतील तोपर्यंत सेवा सुरूच राहील असे ओम नमो बर्फानी बाबा प्रतिष्टानच्या संचालिका शैला सुरेश देसाई यांनी सांगितले. शैलाताई यांना दिनेश राऊत मुंबई, हिरालाल जंगीड नासिक, बाळू पवार नासीक, सुहास भोसले सातारा, सरिता सुर्वे मुंबई यांचे सहकार्य लाभत असून यांच्या मदतीनेच ही सेवा सुफळ होत आहे.

No comments:

Post a Comment