नाशिक :- उत्तम गिते
वेळ सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास. मालेगाव तालुक्यातील वर्हाने येथून वैद्य हॉस्पिटलची रुग्णवाहिका रुग्णाला घेऊन मालेगावात येत असतानाच निसर्ग हॉटेल जवळ अचानक रुग्णवाहिकेने पेट घेतला. या घटनेत रुग्णाला रुग्णवाहिकेतून बाहेर काढत असताना तिघे जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
धावत्या रुग्णवाहिकेतून हॉटेल निसर्गच्या परिसरात धूर निघत असल्याचे चालक सचिन निकम यांच्या लक्षात आले. त्यांनी प्रसंगावधान राखत रुग्णवाहिका रस्त्याच्या कडेला घेतली. रुग्नावाहीकेतील सहकारी खुशाल निकम, जितेंद्र वाडगे व रुग्णाचे नातेवाईक उमेश निकम यांनी ताबडतोब रुग्णाला बाहेर काढले.
क्षणार्धातच रुग्णवाहिकेने पेट घेतला. त्यानंतर अग्निशमन दलाच्या २ बंबांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवली. ८ लाखाचे नुकसान झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
या घटनेत रुग्णाला बाहेर काढताना तिघांच्या शरीराला दुखापत झाली असून त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, डॉक्टर विक्रम वैद्य यांनी रुग्णासह तिघेही जखमी यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती दिली.
No comments:
Post a Comment