तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 4 July 2018

अमरावती जिल्ह्याच्या समस्यांसंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली महत्वपूर्ण प्रकल्पावर मुख्यमंत्र्यांनी केली चर्चा


बाळू राऊत तेज न्यूज हेड लाईन्स
मुंबई : अमरावती जिल्ह्याच्या समस्यांसंदर्भात आढावा बैठक  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवनात घेण्यात आली जलसंधारणाची होत असलेली विविध कामे, जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे, सिंचन विहिरी, पोलिसांसाठी घरे, रस्ते, प्रधानमंत्री आवास योजना, महाराष्ट्र समृद्धी महामार्ग, सिंचन प्रकल्प, पीक कर्ज वितरण आणि इतर बाबींचा सखोल आढावा यावेळी घेण्यात आला.
मेळघाटात कनेक्टीव्हिटीचा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे आदिवासी बांधवांना शासनाच्या कल्याणकारी योजनांचा पुरेसा लाभ मिळत नाही. आदिवासी विकास विभागाने आपली पारंपारिक कार्यपद्धती बदलून नाविन्यपूर्ण योजना आखाव्यात जिल्ह्यातील सिंचनाचा अनुशेष भरुन काढण्यासाठी शासनाने जलयुक्त शिवार अभियान तसेच मागेल त्याला शेततळे योजना सुरू केली आहे.जलयुक्त शिवार अभियान आणि धडक सिंचन विहिरी आणि मनरेगा अंतर्गत घेतलेल्या विहिरींमुळे जलसाठा वाढला आहे. या साठ्याचा पूर्ण क्षमतेने वापर करण्यासाठी कालबद्ध आराखडा तयार करावा, पाणी वापर संस्था वाढवाव्यात,मंत्री श्री प्रवीण पोटे पाटील, विविध लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment