तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 3 July 2018

अभिनव विद्यालयात हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांची जयंती साजरी.

  परळी -

     ज्ञानप्रबोधिनी विकास शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अभिनव विद्यालय नेहरू चौक (तळ) याठिकाणी *हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक*यांची जयंती *संस्थेचे संस्थापक सचिव साहेबराव फड* यांच्या मार्गदर्शनाखाली साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून *शाळेचे मुख्याध्यापक मुंढे पी एम* व प्रमुख पाहुणे म्हणून *कार्यवाहक सूर्यकांत कातकडे सर* मंचावर उपस्थित होते. मंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक  यांच्या प्रतिमेचे पूजन  करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक हे दूरदृष्टी असलेले नेते होते. त्यांनी महाराष्ट्राला प्रगतीच्या वाटेवर नेलेच, पण देशपातळीवरही भरीव कामगिरी केली असे मनोगत कार्यक्रमाचे अध्यक्ष मुंडे पी एम यांनी व्यक्त केले यावेळी प्रमुख अतिथी कार्यवाहक सूर्यकांत कातकडे सर यांनीदेखील आपले विचार व्यक्त केले या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन भांगे एस एन व प्रस्ताविक सहशिक्षक सोमवंशी एस एस तर उपस्थितांचे आभार  देशमुख जे.डी यांनी व्यक्त केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment