तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 3 July 2018

पिक कर्ज द्या नाहितर मरण्याची परवानगी द्या  शेतकरी सुनिल अस्वार यांची सहाय्यक निबंधकाकडे मागणी विदर्भ कोकण ग्रामीण बॅक व्यवस्थापक कडून पिक मंजुरीसाठी पैसेची मागणी !


संग्रामपुर - (प्रतिनिधी) सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने अंतर्गत दीड लाख रुपयांपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली.परंतु बहुतेक शेतकरी त्यापासून वंचीत राहिले.ज्या शेतकऱ्यांना त्या योजनेचा लाभ मिळाला त्या शेतकऱ्यांना आता नविन पिककर्जासाठी बँक अधिकाऱ्यांच्या मुजोरी पणाला सामोरे जावे लागत आहे.
अशाच बँक अधिकाऱ्याच्या मुजोरी पणाला कंटाळून एकलारा बानोदा येथिल शेतकरी सुनिल गजानन अस्वार या शेतकऱ्याने बँक अधिकाऱ्याविरुद्ध सहाय्यक निबंधक जळगाव जामोद यांच्याकडे तक्रार केली आहे.
त्या तक्रार मध्ये त्यांनी नमूद केले आहे की त्यांच्याकडे एकलारा शिवारातील गट नं १८ मधील १ हेक्टर २० आर व उमरा शिवारातील गट नं ६१ यातील ०.२९ आर शेती त्यांच्या व त्यांच्या बहिणीच्या नावे सामूहिक सात बारा आहे.
या अगोदर त्यांच्या सातबारा वर पिककर्जाचा बोझा होता परंतु शेतकरी सन्मान योजनेत त्यांना ते कर्ज माफ झाले.
पण नविन पीक कर्जकरिता त्यांनी २२/०६/२०१८ रोजी वरवट बकाल येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँक यांचे शाखा व्यवस्थापक जोशी यांच्याकडे सर्व कागदपत्रे दिले परंतु त्यांना उद्या या दोन दिवसांनी या तीन दिवसांनी या असे म्हणून पिक कर्जा पासुन डावलण्यात आले.
अखेर ते दि . ०२/०७/२०१८ रोजी बँकेत गेले असता बँक व्यवस्थापक जोशी यांनी सूनिल अस्वार यांना जोपर्यंत ३००० रुपये देत नाही तोपर्यंत तुमचे कर्ज मंजूर होत नाही अशी स्पष्टपणे पैशाची मागणी केली.
त्यामुळे त्यांना नाहक त्रास दिल्याप्रकरणी व्यवस्थापकावर रीतसर कारवाई करून मला पीककर्ज दया अन्यथा मरण्याची परवानगी द्या.अशी अर्जाव्दारे सहाय्यक निबंधकाकडे विनंती केली आहे.

No comments:

Post a Comment