प्रतिनिधी
पाथरी:-शहरातील डिएसएमई सेवाभावी संस्थेच्या वतीने केंद्रिय लोकसेवा आयोगाची तयारी करत असलेल्या आशोक गंगाराम आव्हाड याचा मंगळवारी अर्थिक मदत करण्यात आली.
पाथरी तालुक्यातील सारोळा खु.येथील गरीब शेतरी गंगाराम आव्हाड यांचा मुलगा केंद्रिय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेची तयारी नांदेड येथील आंबेडकरवादी मिशन मध्ये करत असून त्याला या साठी पैशाची सक्त आवश्यकता होती. या विषयीची माहिती जन्मभूमी फाऊंडेशनचे अध्यक्ष सदाशिव थोरात सचिव किरण घुंबरे पाटील यांना मिळताच त्यांनी या विद्यार्थ्याला सोमवारी पाच हजार रुपयांची अार्थीक मदत या विषयीची माहीती डिएसएमई फाऊंडेशनचे डॉ सलीम यांना दिली त्यांनी या कामी पुढाकार घेऊन मंगळवारी या विद्यार्थ्याला त्यांच्या निवासस्थानी बोलाऊन त्याला पाचहजार रूपयांचा संस्थेच्या वतिने धनादेश दिला या वेळी डॉ सलिम शेख जन्मभूमी फाऊंडेशनचे सचिव किरण घुंबरे पाटील यांच्या हस्ते आव्हाड याला पाच हजार रुपयांचा धनादेश दिला.आशोक आव्हाड यांनी गरजेवेळी केलेल्या मदती साठी डिएसएमई फाऊंडेशन आणि जन्मभूमी फाऊंडेशनचे आभार व्यक्त केले.
No comments:
Post a Comment