तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 13 July 2018

पालम तालुक्यातील खराब झालेल्या रस्त्याची दुरुस्ती करा अन्यथा रास्तारोको अंदोलन करणार.. वसंतराव सिरस्कर


अरुणा शर्मा

पालम :- तालुक्यातील रस्ते अत्यंत खराब झाले आहे. रस्त्यात मोठ मोठे खडे पडले असुन रस्त्याने वाहने चालवणे अत्यंत अवघड झाले आहे. या खराब रस्त्या मुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ झालेली आहे. अंजानवाडी ते शेखराजुर हा रस्ता तर खडे कि रस्ता हे कळने कठिन आहे. खडयामुळे बंदच झालेला आहे कारण पावसाळयाचे दिवस असल्यामुळे त्या खडयात पाणी साचले असुन यामुळे अपघात होत आहे. व पाण्या मुळे रोगाची साथ येवु शकते. आणि जर पेंशेट नेहेचे आसेल तर त्याला बैलगाडी किंवा ऊचलुन आनावे लागते यांचा परिणामी जिव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. व अंजानवाडी ते शेखराजुर मुरुडदेव पिंपळगाव, सोमेश्वर ते घोडा, मरडसगाव ते रावराजुर, पालम ते कोळवाडी आदिं गांवाच्या रस्त्याचे काम त्वरीत चालु करावे. आणि पालम ते आरखेड, पालम ते सोमेश्वर या रस्त्याचे काम व पुलाची उंची वाढवून पुलाचे बाधकाम करावे. अशा विविध मागणी चे निवेदन राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीच्या वतीने तहसीलदार तेजस्वीनी जाधव यांना देण्यात आले. जर या मागण्या पुर्ण नाही झाल्या तर राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी पालम तालुक्याच्या वतीने दिनांक 21 जुलै रोजी सकाळी 11 वाजता पालम ते लोहा रोडवर अंजानवाडी जवळील शेखराजुर फाटयावर रास्तारोको अंदोलन करण्यात येणार आसल्याचा ईशारा राष्ट्रवादी पार्टीच्या वतीने देण्यात आला आहे. या निवेदनावर राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी चे पालम तालुका अध्यक्ष वसंतराव सिरस्कर (काका), पं.स. उपसभापती रत्नाकर शिंदे, कादरभाई गुळखंडकर, बन्सीधर रोकडे, अनिल देशमुख, रोहिदास गायकवाड, गंगाधर सिरस्कर, नितीन पळसकर, प्रल्हाद कदम, गोपाल कदम, नवनाथ पौळ, आशोकराव पवार, गंगाधर चाळक, हानुमंत चाळक, हानुमंत भस्के अदिच्या स्वाक्षरया आहे.

No comments:

Post a Comment