तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 4 July 2018

महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या वतीने इंटकचे कार्याध्यक्ष दत्तात्रय गुट्टे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- येथील इंटकचे कार्याध्यक्ष तथा परळी लायन्स कल्बचे दत्तात्रय गुट्टे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे तालुकाध्यक्ष पैलवान मुरलीधर मुंडे व प्रकाश मुंडे यांनी शाल, श्रीफळ व पुष्पहार घालून वाढदिवसानिमित्त सत्कार केला.

         शहरातील भगवान बाबा मंदिर जवळील शिवाजीनगर येथे मुंडे यांच्या संपर्क कार्यालय येथे छोट्या खानी इंटकचे कार्याध्यक्ष तथा परळी लायन्स कल्बचे दत्तात्रय गुट्टे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पैलवान मुरलीधर मुंडे , पैलवान प्रकाश मुंडे, मुक्ताराम कराड, राजु मुंडे आदि उपस्थित होते. दत्तात्रय गुट्टे  यांना वाढदिवसा निमित्त यावेळी सर्वांनी शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment