तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 3 July 2018

"बाबा तुम्ही ग्रेट आहात"पुस्तकाचे प्रकाशन.


शांताराम मगर प्रतिनिधी वैजापुर

ऋषीकेश चव्हाण लिखित"बाबा तुम्ही ग्रेट आहात"या पुस्तकाचे प्रकाशन विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते सुभेदारी गेस्ट हाऊसवर झाले. अध्यक्षस्थानी आ.भाऊसाहेब पा. चिकटगावकर होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून आ.अब्दुल सत्तार, आ.सुभाष झाबंड, द्वारकाभाऊ पाथ्रीकर,जे.के.जाधव,विश्वास पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी मार्गदर्शन करताना हरिभाऊ बागडे यांनी लेखक चव्हाण यांचे मनापासून अभिनंदन करून कौतुक केले. शिक्षण घेण्याच्या वयात लघु कांदबरी लिहिली ही प्रेरणा देणारी आहे, प्रत्येक वडीलांच्या व्याथा जानुन घेऊन त्या पुस्तकात मांडली आहे. सर्वांनी हे पुसतक वाचावे.पुढे बोलताना त्यांनी आधी झालेल्या द्वारकाभाऊ पाथ्रीकर यांच्या भाषणातील धागा धरत मी देवाला मानत नाही, पण बापाला मानतो. या शब्दाचा समाचार घेत, द्वारकाभाऊ यांच्या कडे पहात म्हणाले खरे आहे तुमचे तुम्ही देवाला मानत नाही, पण बापाला मानावेच लागेल कारण तो बाप आहे. आणि बाप देवाला मानतो.. यावर एकच हस्य पिकला...या वेळी विश्वास पाटील फाऊंडेशन वैजापूर व केंद्रीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने ,विश्वास पाटील व हसन सैय्यद यांनी लेखक चव्हाण यास सन्मान पत्र देऊन, सन्मान केला. भागीनाथ पा.मगर, सोपानराव खोसे अब्दुल कय्युम गुलाब मगर,त्र्यंबक पाटील चव्हाण, पि.बी. चव्हाण आदीची उपस्थिती होती दत्तू महाले सचिन तांबे, पवन शिंदे, शुभम चव्हाण, अक्षय गवळी आदीनी कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी परिश्रम घेतले. राजेंद्र कुंदे यांनी सुत्रसंचालन केले, तर त्र्यंबक चव्हाण यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment