तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 31 July 2018

रोटरी क्लब हा सामाजिक उत्तरदायित्व पुर्णत्वास नेणारी संघटना - रो. घुले


प्रा. डॉ. संतोष रणखांब
तेजन्यूज हेडलाईन्स प्रतिनिधी
सोनपेठ :  रोटरी क्लब म्हणजे सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावने मधून निर्माण झालेली संघटना असून कुठल्याही नफ्या तोट्याचा विचार न करता मला समाजाला काही चांगले दिले पाहीजे. इतरांना अडचणीच्या वेळी मदत केली पाहीजे या भावनेने कार्य करायला शिकवाणारी संघटना असल्याचे मत रो. संजय घुले यांनी व्यक्त केले. यावेळी रो. हरिष मोटवाणी, रो. जनार्दन राव, रो. महेंद्र खंडागळे,  रो. माधव वलसे, मा. आ. व्यंकटराव कदम यांच्यासह अनेक मान्यवर रो. प्रदीप गायकवाड यांच्या पदग्रहण सोहळ्याच्या निमित्ताने कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित होते.
शहरातील बालाजी मंदिरात नूतन अध्यक्षांचा पदग्रहण सोहळ्याच्या निमित्ताने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी रोटरी क्लबने मागील वर्षभरात केलेल्या कामाचा अहवाल माजी अध्यक्ष बालमुकुंद सारडा यांनी वाचन केला. त्यानंतर मान्यवरांनी मार्गदर्शन केले. मार्गदर्शनात हरिष मोटवाणी, जनार्दन राव,  यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तसेच नुतन अध्यक्ष रो. प्रदीप गायकवाड व सचिव रो. इंजि. चंद्रकांत लोमटे यांच्याकडे पदभार सोपवण्यात आला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. जाधव व संदिप लष्करे यांनी केले तर आभार नुतन अध्यक्ष प्रदीप गायकवाड यांनी मानले. रोटरी क्लबच्या सर्व सदस्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

No comments:

Post a comment