तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 3 July 2018

महिला सरकारी कर्मचाऱ्यांना मुलांच्या पालन पोषणासाठीही पगारी रजा.


प्रसूती रजेननंतर आता मुलांच्या पालन पोषणासाठीही महिला सरकारी कर्मचाऱ्यांना १८० दिवसांच्या पगारी रजादेण्याचा निर्णय राज्य सरकारनं मंत्रिमंडळ बैठकीत घेतलाय. तसंच बायकोचं निधन झालेल्या पुरुष सरकारी कर्मचाऱ्यांनाही मुलांच्या पालनपोषणासाठी १८० दिवसांची पगारी रजा मिळणार आहे. या निर्णयामुळे १० वी किंवा 12 वीच्या परीक्षा काळांत मुलांसाठी १८०दिवसांची रजा आता महिला आणि पुरुष कर्मचा-यांना घेता येणार आहे. राज्यातील सर्व सरकारी कर्मचा-यांसाठी हा निर्णय लागू असणार असून पुढील काही दिवसांत या निर्णयाचा शासन निर्णय प्रसिद्ध करणार असल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी  दिलीये.

No comments:

Post a Comment