तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 12 July 2018

लोकसंख्येंच्या राक्षसाला आवर घालण्यासाठी जनजागृती आवश्यक - डॉ. पवार


प्रा. डॉ. संतोष रणखांब
तेजन्युज हेडलाईन्स प्रतिनिधी
सोनपेठ : आज लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळे अनेक समस्या उद्भवत आहेत. लोकसंख्येच्या राक्षसाला आवर घालण्यासाठी जनजागृती आवश्यक असल्याचे मत डॉ. सुभाष पवार यांनी व्यक्त केले.
सोनपेठ येथील कै. रमेश वरपुडकर महाविद्यालय व प्रा. आ. केंद्र सोनपेठ यांच्या संयुक्त विद्यमाने आज दि. 11/7/2018 रोजी जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्यात आला. सदरील कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून श्री कांतराव यादव हे होते प्रमुख उपस्थिती म्हणून भगवान राठोड, आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष पवार रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. डाॅ. मारोती कच्छवे, प्रा. डाॅ. बापुराव आंधळे, प्रा. डाॅ. मुक्ता सोमवंशी, डॉ. महाजन, डॉ. शेख व सर्व आरोग्य अधिकारी यांच्यासह रासेयो स्वयंसेवक, स्वयंसेवीकांची व नागरिकांची मोठी उपस्थिती होतीे. याप्रसंगी जनजागरण रँलीचे आयोजन करण्यात आले होते. तसेच आरोग्य केंद्राच्या परिसरात वृक्षारोपन करण्यात आले.

No comments:

Post a Comment