तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 12 July 2018

परभणी कृषी विज्ञान केंद्राच्या वतिने शेतकरी प्रोड्यूसर संपण्यां साठी सीटा संवादाचे आयोजन

किरण घुंबरे पाटील

परभणी:-शेतकरी कंपन्या व फार्मर प्रोड्यूसर कंपन्या आणि शेतमालाचे ठोक खरेदीदार यांच्या साठी इ-काॅमर्स प्लॅटफॉर्मची निर्मिती आणि शेतकरी कंपन्यांच्या सक्षमिकरण कार्यक्रमा अंतर्गत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण,मुंबई विभागिय केंद्र परभणी आणि कृषी विज्ञान केंद्र परभणी यांच्या वतीने १८ जुलै बुधवार रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजे पर्यंत श्री शिवाजी महाविद्यालय सभागृह, वसमतरोड, परभणी येथे 'सिटा संवादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या सिटा संवादा साठी.अध्यक्ष म्हणून डॉ सौ संध्याताई दुधगांवकर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण, मुंबई विभागिय अध्यक्ष परभणी या असनार आहेत तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून वसंतराव नाईक   कृषी विद्यापिठाचे कुलगुरू डॉ ए एस ढवन, मुंबई येथील सिटाचे कार्यकारी संचालक फिरोज मसानी, मुंबई येथील सिटाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल तांबे हे असणानार आहेत तर प्रमुख अतिथी म्हणून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण मुंबईचे दत्ता बाळ सराफ, कृषी विज्ञान केंद्र परभणीचे अध्यक्ष रविराज देशमुख, जि प उपाध्यक्षा भावनाताई नखाते, परभणीचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ बी आर शिंदे, आत्माचे परभणी प्रकल्प संचालक के आर सराफ, नाबार्ड चे परभणी जिल्हा विकास अधिक्षक प्रितम जंगम ,जि प परभणीचे कृषी विकास अधिकारी आर बी हरणे, लिड बँक परभणीचे सुनिल हट्टेकर, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण मुंबई विभागिय केंद्र आैरंगाबाद चे सचिव निलेश राऊत हे राहाणार आहेत. या वेळी शेतकरी कंपन्याच्या मार्गदर्शना साठी -प्रकल्प अहवाल तयार करणे, केंद्र व राज्य सरकार तसेच नाबार्डच्या विविध योजना व कार्यक्रमांचा लाभ मिळवणे,सल्लागार सेवा इत्यादी सेवा सिटाच्या माध्यमातून सुरू करण्यात येणार आहे. त्याच बरेबर शेतकरी कंपन्या आणि कॉर्पोरेट वा मोठे खरेदीदार यांनी शेतकरी कंपन्यां कडून थेट खरेदी करावी या साठी इ-कॉमर्सचा प्लॅटफॉर्म उभारण्या संदर्भात सिटा पुढाकार घेणार आहे. ज्या शेतकरी कंपन्या वायदे बाजारात उतरतात त्यांच्या साठी माहिती सेवा-कमोडिटी इंटेलिजन्स, पुरवण्या संबंधात सिटा उत्प्रेरकाची भूमीका पार पाडणार आहे. या सर्व अनुषंगाने शेतकरी कंपन्यांना वरील विषयांची माहिती व्हावी या करीता या संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात सहभागी असलेले घटक शेतकरी, शेतकरी कंपन्या वा शेतकरी गट, शेती मालाचे व्यापारी, शेतमाल प्रक्रिया उद्योग, कृषी विभागाचे अधिकारी, कमिशन एजंट, नाबार्ड तसेच शेतकरी कर्ज पुरवठा करणा-या बँका, कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी व अधिकारी, कृषी विद्यापिठातील विस्तार विभागाचे अधिकारी वा प्राध्यापक असणार आहेत या कार्यक्रमा साठी जिल्ह्यातील वरील सर्व घटकांनी उपस्थित राहून सिटा संवाद कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण, मुंबई विभागिय केंद्र परभणी. आणि कृषी विज्ञान केंद्र परभणी यांनी केलीन आहे.

No comments:

Post a Comment