तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 11 July 2018

वरवट बकाल ग्रामपंचायतची खातेनिहाय चौकशी करा


संग्रामपुर [ प्रतिनिधी ] तालुक्यातील विविध कारणाने सतत चर्चेत असलेल्या वरवट बकाल ग्रा प कारभारात मोठ्या प्रमाणात अनियमता असुन अनागोदी कारभार सुरू आहे झालेल्या कामात मोठ्या प्रमाणात आर्थिक अनियमता असल्याने या ग्रा प ची खाते निहाय चौकशी करण्याची मांगणी शेख अनिस यांनी मुख्यकार्यपालन अधिकारी यांच्या कडे निवेदना द्वारे केल्याने तालुक्यात खळबळ उडाली असुन ग्रा प च्या कामात हात ओले करण्याचे खेम्यात अस्वस्था पसरलेली आहे
पाठवलेल्या निवेदनात नमुद आहे कि तालुक्यातील वरवट बकाल ग्रा प  मध्ये १३ सदस्य संख्या असुन  गावात १४ वित्त आयोग निधी मधुन झालेल्या कामात मोठ्या प्रमाणात अनियमता गैरवापर करण्यात असुन दलीत वस्ती क्रांकीट रस्ता , अल्पसंख्यांक वस्ती क्रांकीट रस्ता , नवयुवक गणेत्सव मंडळ चौकातील पेवर ब्लाकचे कामे गावातील नाल्याची कामे पाईप लाईन आदी कामे १४ वित्त आयोगातुन करण्यात आली गावातील कामे निकृष्ठ दर्जाची झालेली असल्याने यात ठेकेदार सरपंच व सचिव यानी मोठ्या प्रमाणात हातओले केले असल्याने व झालेला भष्ट्रचार उघडकीस आणण्यासाठी यासर्व झालेल्या कामाची खाते निहाय चौकशी करुन ३० दिवसांच्या संबंधीतांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी  शेख अनिस यांनी मुख्यकार्यपालन अधिकारी यांच्याकडे केल्याने तालुक्यात खळबळ उडाली असुन हातओले करणाऱ्याचे धाबे दणाणले आहे मुख्यकार्यपालन अधिकारी यांच्या कडून चौकशी नंतर कोणती कारवाई संबंधीतांवर होते याकडे वरवट बकाल येथील सुज्ञ ग्रामस्था सह तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे

No comments:

Post a Comment