तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 3 July 2018

ग्रीन अर्थ ऑर्गनायझेशन वृक्षदिंडीच्या समारोप कार्यक्रमाला मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती


बाळू राऊत / तेज न्यूज हेडलाईन्स
मुंबई :वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरी या संत तुकाराम यांचा अभंगा प्रमाणे पर्यावरणाचा कसा समतोल राहील या साठी गेली दोन वर्ष  ग्रीन अर्थ ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष आमदार प्रा.अनिल सोले प्रयत्न  हे करत आहेत आज आपल्या देशात भरमसाठ वृक्षतोड होत आहे .आणि नागरिकांमध्ये  वृक्षारोपण याविषयी जनजागृती  करणे काळाची गरज आहे .
ग्रीन अर्थ ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष आमदार प्रा.अनिल सोले यांच्या पुढाकाराने सलग दोन वर्षांपासून वृक्ष दिंडीचे आयोजन करण्यात येत आहे नागरिकांमध्ये वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने ग्रीन अर्थ ऑर्गनायझेशनच्यावतीने आयोजित वृक्ष दिंडीला चांगला प्रतिसाद मिळाला या दिंडीचा शुभारंभ २८ जूनला देवरी येथून सुरू होऊन 3 जूलै ला नागपूर येथे समारोह झाला .नागपूर येथे आयोजित वृक्षदिंडीच्या समारोप कार्यक्रमाला मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते त्यावेळी अर्थ-वित्त नियोजन व वन मंत्री सुधीर मुनगंटीवार तसेच राज पुरोहित
राज्य सरकारच्या 13 कोटी वृक्षारोपणाच्या मोहिमेच्या अनुषंगाने हा कार्यक्रम ग्रीन अर्थ ऑर्गनायझेशनने आयोजित केला होता. मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्य सरकारने संपूर्ण महाराष्ट्रात 50 कोटी वृक्ष लागवड करण्याचा एक महत्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला आहे आणि हा भारतातील सर्वात मोठा कार्यक्रम आहे. जागतिक तापमानात सातत्याने होत असलेली वाढ हा केवळ चर्चेचा विषय नाही, तर ठोस कृती करण्याची हीच खरी वेळ आहे.

No comments:

Post a Comment